शेतकरी संघटनेने प्रतिबंधित एच टी बी टी कापसाची लागवड करून केला सविनय कायदेभंग
>> प्रसाद नायगावकर
शेतकऱ्यांचे उत्पन्न दामदुप्पट करू अश्या वल्गना मोदी सरकार गेल्या दहा वर्षांपासून करीत आहे. सध्याच्या परिस्थितीत शेतकरी जे कापसाचे बियाणे लागवड करतात त्यात मुद्दलही निघणे दुरापास्त झाले आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या हिताचे असलेले आणि कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे पण प्रतिबंधित HTBT बियाणांच्या लागवडीची परवानगी मिळवण्यासाठी शेतकरी संघटनेने आंदोलन छेडलं आहे. या संदर्भातले सर्व कायदे झुगारत देत शेकडो शेतकरी या आंदोलनात सहभागी होऊन यवतमाळ जिल्ह्यातील तूपटाकळी येथे सहभागी झाले आहेत. काहींनी प्रतीकात्मक HTBT बियाणांची पेरणी केली आहे आणि सविनय कायदेभंग केला आहे . स्वातंत्र्यानंतरही शेतकऱ्यांना आपल्या न्याय आणि हिताच्या मागणीसाठी सविनय कायदेभंग आंदोलन करावे लागते ही अत्यंत खेदाची बाब आहे.
HTBT कापूस नवीन संशोधित कापसाचं वाण आहे. त्यावर सरकारने बंदी घातली आहे. पण ते चोरट्या मार्गाने मोठया प्रमाणात उपलब्ध आहे. शेतकरीही त्याची लागवड करताहेत. ते तणरोधक असल्याने फवारणी केल्यानंतर तण काढण्याचा खर्च कमी होतो. सध्या हे संशोधित बियाणं असून प्रमाणित नाही. संशोधित बियाणांना सरकारने प्रमाणित करावं. अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे.
शासन मान्यता नसल्यामुळे शेतकरी चोरट्या मार्गाने त्याची लागवड करतात. पण अशावेळी शेतकऱ्यांची फसवणूक सुद्धा होते. सद्य स्थितीत भारतीय शेतकऱ्यांना जागतिक बाजारापेठेशी स्पर्धा करावी लागते बाकी कापूस उत्पादक देशात आधुनिक बियाणी आहेत. त्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च कमी असून पीक चांगल आहे.मात्र भारतात ही विपरीत परिस्थिती आहे.
HTBT बियाण्यां संदर्भात शेतकऱ्यांनी सरकारला प्रश्न केला आहे, ज्या अहवालामध्ये मग तो WHO चा असो किंवा इतर त्यांनी हे बियाणे मानवी शरीराला अपायकारक किंवा पर्यावरणाला धोकादायक असेल तर शेतकऱ्यांसमोर तो अहवाल सादर करावा. पण सरकार कारणंही सांगायला तयार नाहीत. फक्त मानवी जीवनाला धोका पोहोचतो या सबबीखाली त्यांनी या बाबत संमती थांबविली आहे. मग खरंच हे मानवी शरीराला अपायकारक असेल तर तुम्ही बाहेर देशातील तेल, तूर आयात करता ते कसं चालतं.असा खडा सवाल शेतकऱ्यांनी सरकारला विचारला आहे.
दिग्रस तालुका येथील तूपटाकळी या गावातील शिवारात शेतकरी संघटनेने आधुनिक तंत्रज्ञान जेनेटिक मॉडिफाइड सीड एच टी बी टी कापूस बियाण्याची लागवड करून सरकारला दिशा देण्याचे काम केले आहे. आणि शेतकरी संघटने केली प्रतीबंधित एच टी बी टी बियाण्यांना तात्काळ परवानगी देण्याची विनंती सरकारला केली आहे.
गेल्या तीन चार वर्षांपासून हे बियाणं अवैध मार्गाने संपूर्ण देशात जात आहे. हे बियाणं गुजरात आणि आंध्र प्रदेशमधून येतं. तिथल्या शेतकऱ्यांच्या शेतात हे बियाणं तयार होतं. तिथलं सरकार त्यांच्यावर कुठलीच कारवाई करत नाही. महाराष्ट्रात आल्यानंतर ही नाटकं का केली जातात? भारत सरकारने कोणत्याही सबबी न देता HTBT बियाण्यांना परवानगी दिली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या संदर्भात दिलेली वाचणे पाळली पाहिजेत.
– राहुल ठाकरे ( माजी यवतमाळ जिल्हा परिषद अध्यक्ष )
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List