हिना खान आहे टीव्हीची सर्वात महागडी अभिनेत्री, दर महिन्याला लाखोंची कमाई आणि…

हिना खान आहे टीव्हीची सर्वात महागडी अभिनेत्री, दर महिन्याला लाखोंची कमाई आणि…

हिना खान हिने नुकताच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये. हिना खान हिने शेअर केलेली ही पोस्ट पाहून तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. हिना खान हिने तिच्या पोस्टच्या माध्यमातून थेट सांगितले की, तिला ब्रेस्ट कॅन्सर झालाय, सध्या उपचार सुरू असून आपण तिसऱ्या टप्प्यात असल्याचे देखील हिना खान हिने म्हटले आहे. हिना खान हिने शेअर केलेली ही पोस्ट पाहून चाहते तिच्या चांगल्या आरोग्यासाठी सातत्याने प्रार्थना करताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चा होती की, हिना खान हिला मोठ्या आजाराची लागण झालीये. आता हिनानेच याबद्दल खुलासा केलाय.

हिना खान हिने ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेत अनेक वर्ष अक्षराची भूमिका साकारली. हिना खान ही मुळ जम्मू-काश्मीरची आहे. हिना खानचा जन्म एका मुस्लिम कुटुंबात झाला. हेच नाही तर हिना खानचे शिक्षण हे एमबीएपर्यंत झाले आहे. 2008 मध्ये ‘इंडियन आयडल’चे ऑडिशन हिनाने दिले. 30 पर्यंत तिने मजल मारली.

हिना खान सुरूवातीला एका एपिसोडसाठी 1 ते 1.5 लाख रूपये फीस घेत होती. आता हिना खान ही एका एपिसोडसाठी 2 लाखांपेक्षा जास्त फीस घेते. हिना खान ही टीव्हीच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रत्येक महिन्याला हिना खान ही 35 लाखांपर्यंत कमाई करत असल्याचे देखील सांगितले जाते.

विशेष म्हणजे हिना खान ही मोठ्या संपत्तीची मालकीन देखील आहे. हिना खान हिचे नेटवर्क 52 कोटींपर्यंत आहे. यासोबतच जाहिरातीच्या माध्यमातूनही कमाई हिना खान करते. काही दिवसांपूर्वीच हिना खान ही हजला गेली होती. विशेष म्हणजे ती तिच्या आईसोबत गेली होती. हिना खानने सोशल मीडियावर काही फोटोही शेअर केले होते.

हिना खान ही सलमान खान याच्या चित्रपटामध्ये धमाका करणार असल्याचे सांगितले जाते. मात्र, हा चित्रपट नेमका कोणता याबद्दल खुलासा हा होऊ शकला नाहीये. हिना खान हिने मध्यंतरी एक फोटोशूट केले होते. त्या फोटोशूटनंतर तिच्यावर जोरदार टीका देखील करण्यात आली. हिना खानने शेअर केलेली पोस्ट व्हायरल होत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;