अरविंद सावंत यांची लोकसभा, तर संजय राऊत यांची राज्यसभा गटनेतेपदी नियुक्ती; अनिल देसाई प्रतोद

अरविंद सावंत यांची लोकसभा, तर संजय राऊत यांची राज्यसभा गटनेतेपदी नियुक्ती; अनिल देसाई प्रतोद

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नऊ खासदार निवडून आले. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून अरविंद सावंत यांनी सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकत हॅटट्रिक साधली. त्यानंतर आता त्यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. लोकसभेमध्ये शिवसेनेच्या गटनेतेपदी खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर दक्षिण-मध्य मुंबईचे नवनिर्वाचित खासदार अनिल देसाई यांची प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांची राज्यसभा गटनेतेपदी आणि दोन्ही सभागृहांच्या संसदीय पक्षाचे नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून या नियुक्तींची माहिती दिली आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्राच्या सुरुवातीलाच लोकसभा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ओम बिर्ला यांचे अभिनंदन केले. 18व्या लोकसभेमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे 9 सदस्य असून राज्यसभेत 2 सदस्य आहेत. खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेच्या गटनेतेपदी, तर खासदार अनिल देसाई यांची प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेच्या गटनेतेपदी आणि दोन्ही सभागृहांच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे, अशी माहिती पत्राद्वारे लोकसभा अध्यक्षांना कळविण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;