पेपरफुटीवर चर्चा करण्यासाठी लोकसभेतील कामकाज स्थगित करा, सुप्रिया सुळे यांची मागणी

पेपरफुटीवर चर्चा करण्यासाठी लोकसभेतील कामकाज स्थगित करा, सुप्रिया सुळे यांची मागणी

राज्यातच नव्हे तर देशात सध्या नीट पेपर फुटी प्रकरण गाजत आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज बाजूला ठेवून नीट -युजी आणि युजीसी – नेट परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणावर चर्चा करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्षयांकडे स्थगन प्रस्ताव सादर केला आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील आणि देशभरातील 25 लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागलेल्या नीट – युजी परीक्षेचे पेपर फुटल्याचे प्रकरण समोर आले. पण त्यावर सरकारच्या पातळीवर काहीही उपाययोजना केल्या गेलेल्या नाहीत. त्याचप्रमाणे युजीसी – नेट परीक्षेचा पेपरदेखील फुटल्याचे प्रकरण समोर आले. पेपरफुटी प्रकरणामुळे नॅशनल टेस्टिंग एजन्सीची उपयुक्तता आणि विश्वासार्हता यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सरकारने विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवण्याच्या या परीक्षा घेण्यात दाखवलेल्या निष्काळजीपणामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. या प्रकरणात केवळ निष्काळजीपणाच दिसून येत नाही तर यात भ्रष्टाचारही झालेला आहे. त्यासाठी देशभरातील तमाम विद्यार्थ्यांच्या वतीने मी विनंती करते कि, सरकारने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याची गरज असून आज दिवसभरातील सभागृहापुढील अन्य सर्व विषय बाजूला ठेवून या विषयावर चर्चा करून कायमस्वरुपी तोडगा काढायला हवा. सभागृहाने यावर धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचे सुप्रियासुळे यांनी पत्रात म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;