सोनू निगमने भर मंचावर धुतले आशा भोसलेंचे पाय; व्यक्त केल्या भावना

सोनू निगमने भर मंचावर धुतले आशा भोसलेंचे पाय; व्यक्त केल्या भावना

पद्मविभूषण आशा भोसले यांच्यावरील 90 लेख आणि दुर्मिळ छायाचित्रांनी नटलेल्या ‘स्वरस्वामिनी आशा’ या पुस्तकाचं आज (28 जून) प्रकाशन करण्यात आलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते विलेपार्ले इथल्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह इथं हा प्रकाशन सोहळा पार पडला. या सोहळ्याला पंडित हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, अशोक सराफ, सुरेश वाडकर, श्रीधर फडके, रवींद्र साठे, पद्मजा फेणाणी, उत्तरा केळकर, सुदेश भोसले, वैशाली सामंत तसंच जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर, पूनम ढिल्लो, पद्मिनी कोल्हापुरे हेसुद्धा उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक सोनू निगमने आशाताईंचे पाय गुलाबपाणीने धुतले. पाय धुवून त्याने आशाताईंच्या चरणी डोकं टेकवलं.

या कार्यक्रमात मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार हेसुद्धा उपस्थित होते. “स्वरांची देवता आणि आमच्या ताई आशाताईंसोबत यावेळी मंचावर एकत्रित येण्यापेक्षा वेगळं सुख हे कोणतं असूच शकत नाही. हे पुस्तक बनवण्याची कल्पना ज्या पद्धतीने समोर आली, त्यामध्ये पहिल्यापासून आम्ही सगळेच होतो. सगळ्या टीमने ज्या पद्धतीने या पुस्तकासाठी मेहनत घेतली, त्यावरून मी तुम्हाला नक्की सांगतो की हे पुस्तक केवळ तुम्हाला आनंद देणार नाही, सुख देणार नाही तर समाधानही देईल”, असं शेलार म्हणाले.

या कार्यक्रमात सोनू निगम म्हणाला, “आज सोशल मीडियावर गायन शिकण्यासाठी अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. मात्र आधीच्या काळात लताजी आणि आशाजी याच होत्या. आशाताईंकडून आम्ही खूप काही शिकलो. त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. आम्हाला आजही त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळतं. आपल्या हिंदू धर्मात, सनातन धर्मात गुरूंना देवाचं स्थान आणि महत्त्व दिलं जातं. आमच्यासाठी आशाताई देवी आहेत.” सनातन धर्माच्या वतीने तुमचा सन्मान करू इच्छितो असं सांगत सोनू निगमने मंचावर आशाताईंचे पाय गुलाबपाण्याने धुतले आणि त्यांचा आशीर्वाद घेतला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;