पावसाचा आनंद लुटायला गेले अन् समुद्रात पडले; चौघांसाठी पोलीस देवदूत बनले !

पावसाचा आनंद लुटायला गेले अन् समुद्रात पडले; चौघांसाठी पोलीस देवदूत बनले !

समुद्रकिनाऱ्यावर लाटा अंगावर घेत पावसाचा आनंद लुटण्याचा मोह लहानांपासून थोरांपर्यंत कुणालाही आवरत नाही. पण हाच आनंद चौघांना महागात पडला आहे. मुंबईतील दोन विविध घटनांमध्ये समुद्राच्या पाण्यात पडलेल्या चौघांना वाचवण्यात पोलिसांना यश आले आहे. पहिली घटना मरिन ड्राईव्ह येथे घडली. एका 59 वर्षीय महिलेला पोलिसांनी बुडण्यापासून वाचवले. तर दुसरी घटना गेट वे ऑफ इंडिया येथे घडली असून, या घटनेत तिघांचे प्राण वाचवण्यात आले.

स्वाती कनानी या 59 वर्षीय महिला पावसाचा आनंद लुटण्यासाठी मरीन ड्राईव्ह येथे आल्या होत्या. समुद्रकिनाऱ्यावर मजा करत असतानाच स्वाती यांची पर्स पाण्यात पडली. पर्स पाण्यातून काढण्याचा प्रयत्न करत असतानाच स्वाती यांचा पाय घसरला आणि त्या पाण्यात पडल्या. सीपीआर प्लाटूनच्या दोन पोलिसांनी महिलेला पाण्यात पडलेले पाहिले. त्यांनी तात्काळ पाण्यात उडी घेत महिलेचे प्राण वाचवले. महिलेला किरकोळ जखम झाली असून, उपचारासाठी जी टी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

&

nbsp;

दुसरी घटना गेट वे ऑफ इंडिया येथे घडली. गेटवे ऑफ इंडिया येथे सुरक्षाभिंतीवर बसून लाटांचा आनंद लुटत असताना तीन जण पाण्यात पडले. गुरुवारी दुपारी 2.45 वाजण्याच्या सुमारास भरतीच्या वेळी उसळलेल्या शक्तीशाली लाटांच्या माऱ्यामुळे तोल जाऊन तिघे पाण्यात पडले. मात्र दैव बलवत्तर म्हणून पोलिसांनी तिघांनाही वाचवण्यात यश आले. तिघांनाही किरकोळ जखमा झाल्या आहेत. घटनेनंतर पोलिसांनी सतर्क होत तात्काळ सुरक्षाभिंतीपासून सर्व नागरिकांना दूर केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;