बजाज फायनान्सची 10 लाखांची फसवणूक, हुपरीत 32 जणांवर गुन्हा

बजाज फायनान्सची 10 लाखांची फसवणूक, हुपरीत 32 जणांवर गुन्हा

हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथील लकी फर्निचरच्या माध्यमातून ग्राहकांच्या नावे बोगस कर्जप्रकरणे मंजूर करून बजाज फायनान्सची 10 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फायनान्स कंपनीचा सेल्स एक्झिक्युटिव्ह व लकी फर्निचरच्या मालकासह 32 ग्राहकांविरोधात हुपरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बजाज फायनान्स कंपनीचे सेल्स एक्झिक्युटिव्ह आकाश राजेंद्र गणपते (वय 25, रा. मुसळे गल्ली, षटकोन चौक, इचलकरंजी), लकी फर्निचरचा मालक लखन राजेंद्र कोळी (वय 24, रा. सलगरा दिवटी, ता. तुळजापूर, जि. धाराशीव)  तसेच फर्निचर शो रूमबरोबर साहित्य खरेदीसाठी करारबद्ध असलेला परशुराम बागडी (रा. वाळवेकरनगर, हुपरी) यांच्यासह इचलकरंजी व हुपरी परिसरातील 29 ग्राहकांचा समावेश आहे.

अपहारप्रकरणी बजाज फायनान्सचे रिस्क मॅनेजर राहुल बसवाणी हसबे (वय 34) यांनी आज 32 जणांविरोधात हुपरी पोलिसांत गुन्हा दाखल केला. यामध्ये इचलकरंजीतील 24, हुपरीतील 4, रेंदाळच्या एका ग्राहकाचा समावेश आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;