इंडिगो विमानात महिला प्रवाशाचा गोंधळ, क्रू मेंबर्सना शिवीगाळ
सीट बदलणाऱ्यावरुन एका महिला प्रवाशाने वाराणसी-मुंबई विमानात कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. विमान मुंबईत दाखल होताच कर्मचाऱ्यांनी महिलेला विमानतळ पोलिसांच्या स्वाधीन केले. वाराणसी-मुंबई इंडिगो विमानात ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, 175 प्रवाशांना घेऊन सोमवारी वाराणसीहून मुंबईच्या दिशेने इंडिगो विमानाने उड्डान केले. विमानात 9 क्रमांकाच्या सीटवर बसलेल्या महिलेने क्रू मेंबरकडे सीट बदलून मागितली. त्याप्रमाणे क्रू मेंबरने तिला सीट बदलून 15 क्रमांकाच्या सीटवर बसण्यास सांगितले. मात्र महिलेने 15 क्रमांकाच्या सीटवर जाण्यास नकार दिला.
यानंतर 15 मिनिटांनी महिला वॉशरुमला गेली. तेथून आल्यानंतर विमानातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि अपशब्द बोलू लागली. सुरवातीला कर्मचाऱ्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र महिला थांबायचे नावच घेत नव्हती. कर्मचाऱ्यांनी महिलेला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र ती ऐकायलाच तयार नव्हती.
महिलेच्या आरडाओरडा करत शिवीगाळ करण्याने विमान कर्मचाऱ्यांसह अन्य प्रवाशांनाही नाहक त्रास सहन करावा लागला. अखेर विमान मुंबईत दाखल होताच कर्मचाऱ्यांनी महिलेला विमानतळ पोलिसांच्या ताब्यात दिले. महिलेविरुद्ध आयपीसी आणि विमान नियमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List