T20 World cup 2024 : ट्रॉफी घरी येणार.. भारताने फायनलमध्ये धडक मारताच शुभेच्छांचा वर्षाव, अजय देवगण- वरूण धवनसह सेलिब्रिटींच्या पोस्ट व्हायरल

T20 World cup 2024 : ट्रॉफी घरी येणार.. भारताने फायनलमध्ये धडक मारताच शुभेच्छांचा वर्षाव, अजय देवगण- वरूण धवनसह सेलिब्रिटींच्या पोस्ट व्हायरल

27 जून रोजी ‘कल्की 2898 एडी’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाने एकीकडेबॉक्स ऑफिसवर धुमाकूळ माजवला असतानाच संपूर्ण देशाच्या नजरा टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या सेमीफायनलकडे लागल्या होत्या. काल भारताने सेमीफायनलमध्ये इंग्लंडचा 68 धावांनी दणदणीत पराभव केला. या विजयाचा आनंद फक्त टीम इंडियाच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर नव्हता, तर संपूर्ण देशाच्या चेहऱ्यावर दिसत होता. सेमीफायनलमध्ये धडाकेबाज विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या टीम इंडियाला प्रत्येकजण शुभेच्छा देत आहे. या बाबतीत बॉलिवूड स्टार्सही मागे कसे राहतील ? अजय देवगण, आयुष्मान खुराना, अभिषेक बच्चन आणि वरुण धवन यांसारख्या बॉलीवूड सेलिब्रिटींनी IND विरुद्ध ENG सेमीफायनल सामन्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा जयजयकार करत त्यांचे अभिनंदन केले. सोशल मीडियावर पोस्ट्स शेअर करत या सेलिब्रिटींनी भारतीय संघाचे अभिनंदन तर केलेच पण अंति सामन्यासाठी शुभेच्छाही दिल्या.

अजय देवगणने X (पूर्वीचं ट्विटर) एक खास पोस्ट शेअर केली. “आमचं पुनरागमन झालंय दाखवायची वेळ आली आहे. (भारतीय संघ) इतिहास रचण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे ! “ट्रॉफी घरी आणण्याची वेळ आली आहे.” असं ट्विट त्याने केलं.

 

तर आयुष्मान खुरानानेही भारतीय संघातील खेळाडूंचं कौतुक करत फायनलमध्ये पोहोचण्याचा त्यांना खरा हक्क आहे, असे म्हटले. ‘ भारताने उत्तम खेळ केला ! रोहित, स्काय, कुलदीप, अक्षर, बुमराह, यांच्यासंह सर्वांनीच उत्तम खेळ केला. ‘ असे म्हणत त्याने सर्वांचे कौतुक केले.

 

अभिनेता अभिषेक बच्चन यानेही ट्विटर पोस्ट शेअर करत विजयापासून अवघं एक पाऊल दूर.. ! कम ऑन इंडिया ! ऑल द बेस्ट फॉर T20 world cup finals ! असा मेसेज लिहीला आहे.

वरुण धवन आणि विक्रांत मेस्सीनेही टीम इंडियाचा कौतुक केले. वरुणने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर मेन इन ब्लूचा फोटो पोस्ट केला. तसेच त्याने टी-20 विश्वचषकाच्या सेमीफायनलमधील भारताच्या विजयाबद्दल अभिनंदन केले.

 

12th Fail मुळे चर्चेत आलेला नामवंत अभिनेता विक्रांत मेस्सीनेही दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत त्याने सूर्य कुमार यादव दिसतोय आणि “स्काय इज द लिमिट.” असं लिहीलं आहे. तर दुसरा फोटो रोहित शर्माचा असून त्यावर “बॉस” असं लिहीण्यात आलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;