मालाडमधील आईस्क्रीममध्ये सापडलेले बोट कोणाचे? डीएनए अहवालात धक्कादायक खुलासा
मुंबईतील मालाड परिसरात आईस्क्रीममध्ये सापडलेल्या बोटाच्या डीएनए चाचणीचा अहवाल समोर आला आहे. या अहवालात हे बोट इंदापूरमधील एका फॅक्टरीतील कर्मचाऱ्याचे असल्याचे सिद्ध झाले आहे. ओमकार पोटे असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. फॅक्टरीमध्ये आईस्क्रीम पॅक करण्याचे काम करत असताना ओमकारच्या बोटाला अपघात झाला. यानंतर ओमकारचे मधले बोट तुटून आईस्क्रीमच्या कोनमध्ये पडले.
मालाड येथील रहिवासी डॉ. ब्रेंडन फेराओ यांनी ऑनलाईन अॅपद्वारे 12 जून रोजी यम्मो ब्रँडचे बटरस्कोच आईस्क्रीम मागवले होते. आईस्क्रीम खात असताना जीभेवर त्यांना काहीतरी वेगळे असल्याचे जाणवले. त्यांनी काय आहे हे पाहिले असता तो माणसाच्या बोटाचा तुकडा असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
आईस्क्रीममध्ये बोटाचा तुकडा पाहून डॉक्टर हैराण झाले. यानंतर फेराओ यांनी तात्काळ मालाड पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच मालाड पोलिसांनी फेराओ यांच्या घरी दाखल होत घटनेची शहानिशा केली. यानंतर पोलिसांनी हे बोट ताब्यात घेत आईस्क्रीम कंपनीविरोधात एफआयआर दाखल केला. हे बोट कुणाचे आहे याचा तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांना हे बोट पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील एका फॅक्टरीतील कर्मचाऱ्याचे असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर हे बोट याच कर्मचाऱ्याचे आहे का? हे तपासण्यासाठी डिएनए चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल सादर करण्यात आला असून, हे बोट पोटे या कर्मचाऱ्याचेच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List