पोलीस भरती उमेदवारांची राहण्याची व्यवस्था करा, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
पोलीस भरतीसाठी मुंबईत हजारोंच्या संख्येने राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या उमेदवारांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे या उमेदवारांना राज्य सरकारने सोयी-सुविधा द्याव्यात आणि त्यांच्या राहण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. याची दखल घेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या युनिटला आवश्यक सूचना दिल्याची माहिती दिली.
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांच्या गैरसोयीचा प्रश्न मांडला. हे उमेदवार निवाऱयासाठी रस्त्यावर, पुलाखाली आडोसा घेत आहेत. त्यामुळे या भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची मोठी गैरसोय होत आहे. राज्य सरकारने त्यांची व्यवस्था करावी, अशी मागणी विधान परिषदेत दानवे यांनी केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List