राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न द्या; राष्ट्रपती-पंतप्रधानांकडे मागणी
थोर समाजसुधारक राजर्षी शाहू महाराज व महिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख यांचा ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मान करावा, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. समाजातील सर्व घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणाऱया शाहू महाराजांना तसेच शिक्षणतज्ञ, समाज सुधारक आणि हिंदुस्थानाच्या पहिल्या महिला मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख यांनी महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यासोबत शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारत सरकारने त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करावा अशी मागणी त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडेही केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List