‘ते’ बोट डेअरीतील कर्मचाऱयाचे, डीएनए अहवाल झाला प्राप्त
आईस्क्रीमच्या पाकिटात सापडलेले ते बोट डेअरीमधील फ्रुट फीडर मशीनचे काम करणाऱया कर्मचाऱयाचे असल्याचे उघड झाले आहे. नुकताच पोलिसांना डीएनए अहवाल प्राप्त झाला आहे.
तक्रारदार हे डॉक्टर असून ते मालाड येथे राहतात. काही दिवसांपूर्वी तक्रारदार याच्या बहिणीने एका ऑनलाईन अॅप्सवरून बेसन आटा आणि आईस्क्रीमची ऑर्डर केली. काही वेळाने डिलिव्हरी बॉय त्याच्या घरी आला. जेवण झाल्यावर ते सर्व आईस्क्रीम खात होते. आईस्क्रीम खाताना तक्रारदार याच्या तोंडात तुकडा आला. त्याने तो तुकडा बाहेर काढला. तेव्हा तो नख असलेला मांसाचा तुकडा असल्याचे समोर आले. त्यानंतर तक्रारदार याने संबंधित आईस्क्रीम कंपनीशी संपर्क साधला. आईस्क्रीममध्ये बोटाचा तुकडा आल्याची तक्रार कंपनीकडे केली. तक्रार केल्यानंतरदेखील त्यांना कंपनीने काहीच प्रतिसाद दिला नाही. अखेर त्याने मालाड पोलीस ठाण्यात धाव घेतली. मालाड पोलिसांनी तपास केला.
पुण्याच्या एका फॅक्टरीमध्ये ते आईस्क्रीम तयार करण्यात आले होते. महिन्याभरापूर्वी ते आईस्क्रीम तयार करण्यात आले होते. आईस्क्रीम पॅक करताना अपघात झाल्याने त्या कर्मचाऱयाचा बोटाचा तुकडा त्यात पडला अशी माहिती तपासात समोर आली आहे. त्या बोटाचा नमुना तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आला आहे. त्या कर्मचाऱयाची डीएनए चाचणी केली गेली. त्याचा अहवाल नुकताच मालाड पोलिसांना प्राप्त झाला. फ्रुट रीडर मशीन ऑपरेटर कर्मचारी त्याचे ते बोट असल्याचे उघड झाले आहे. जप्त केलेले ते बोट किती दिवसापूर्वी कापले गेले होते हे फॉरेन्सिक अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List