जे. जे. बस अपघात, विद्यार्थ्यांच्या मदतीला धावले ‘बेस्ट’ कर्मचारी!

जे. जे. बस अपघात, विद्यार्थ्यांच्या मदतीला धावले ‘बेस्ट’ कर्मचारी!

बुधवारी सकाळी जे. जे. उड्डाणपुलावर अपघात झाल्यानंतर काही क्षणातच ‘बेस्ट’च्या कर्मचाऱयांनी सर्व विद्यार्थ्यांना सुखरूप बसबाहेर काढून जखमींना जी.टी. रुग्णालयात दाखल केले. या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि बेस्ट प्रशासनाने या जिगरबाज कर्मचाऱयांचे कौतुक करीत सत्कार केला आहे.

बेस्टच्या पाठकवाडी येथील  कामगार रात्रपाळीचे काम करून बुधवार, 26 जून रोजी सकाळी 6.45 वाजता जे. जे. उड्डाणपुलावरून परत येत होते. यावेळी अंजुमन इस्लाम हायस्कूलची विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस भरधाव वेगाने ओव्हरटेक करताना संरक्षक भिंतीला आदळून मोठा अपघात झाला.  यावेळी सुदैवाने बसच्या मागून येणाऱया बेस्टच्या विद्युत जोडणी विभागाच्या कर्मचाऱयांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. यामध्ये बसमधील जखमी नऊ विद्यार्थ्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अपघाताची माहिती अधिकारी नवघरे  आणि विभागीय अभियंता नारखेडे यांना कळवली. ‘बेस्ट’ कर्मचारी जोडारी सदू खतेली, जोडारी जोडीदार प्रलेश चायनाखवा, नवघाणी सतीश गवळी, वाहनचालक प्रदीप भोंडवे, नैमित्तिक कामगार सूर्यकांत सुर्वे, संदीप सुर्वे, आनंदा मेदार यांच्या कामगिरीबद्दल शिवसेनेचे माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांनी यांनी पाठकवाडी येथे जाऊन सर्व कर्मचाऱयांचा सत्कार केला. यावेळी बेस्ट कामगार सेनेचे उपाध्यक्ष गणेश शिंदे, मिलिंद हळदणकर, अधिकारी शिवदास फुलपगारे, अजय सावंत, पैलाश डाबेराव, अजित कुलकर्णी आदी उपस्थित होते. दरम्यान, कुलाबा आगार येथील मुख्यालयात विद्युत पुरवठा सहाय्यक महाव्यवस्थापक बिलाल शेख यांच्या हस्तेही संबंधित कर्मचाऱयांचा गौरव करण्यात आला. यावेळी बेस्टचे अधिकारी नेताजी चौगुले, सुरेश मकवाना, सुनील वैद्य उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;