नीट पेपरफुटीप्रकरणी सीबीआयकडून दोघांना अटक

नीट पेपरफुटीप्रकरणी सीबीआयकडून दोघांना अटक

नीट पेपरफुटीप्रकरणी सीबीआयने आज दोघांना पाटणा येथून अटक केली. मनीष कुमार आणि आशुतोष कुमार अशी या दोघांची नावे असून परीक्षेपूर्वी दोघांनी उमेदवारांना प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका दिल्याचा सीबीआयला संशय आहे. परीक्षेतील गोंधळाचा मुद्दा ‘इंडिया’ आघाडीने लोकसभेत लावून धरला आहे. तर दिल्लीसह देशभरात विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात जोरदार आंदोलन पुकारले आहे. या पार्श्वभूमीवर सीबीआयकडून जलद कारवाई सुरू असल्याचे चित्र आहे.

पेपरफुटीप्रकरणी सीबीआयने आतापर्यंत एकूण सहा एफआयआर दाखल केले आहेत. एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सी नीट यूजी परीक्षा देशभरातील सरकारी तसेच खासगी संस्थांमध्ये एमबीबीएस, बीडीएस, आयुष आणि इतर अभ्यासक्रमांना प्रवेश मिळण्यासाठी आयोजित करते. यंदा ही परीक्षा तब्बल 571 शहरांमध्ये 4 हजार 750 पेंद्रांवर 5 मे रोजी आयोजित करण्यात आली होती. परीक्षेसाठी 23 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. दरम्यान, सीबीआयने याप्रकरणी पहिला गुन्हा रविवारी दाखल केला. त्याच्या एक दिवस आधीच सरकारने नीट परीक्षेतील घोटाळय़ांचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची घोषणा केली होती.

सर्वोच्च न्यायालयाची एनटीएला पुन्हा नोटीस
नीट परीक्षेतील घोटाळय़ाप्रकरणी दाखल नव्या याचिकांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज एनटीएला पुन्हा नोटीस बजावली. नीट परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना देण्यात आलेल्या ओएमआर शीटसंबंधी तक्रारी दाखल करण्यासाठी काही कालावधी निश्चित केला आहे का, असा सवालही सर्वोच्च न्यायालयाने आज एनटीएला विचारला. नव्या याचिकांवर न्यायमूर्ती मनोज मिश्रा आणि न्यायमूर्ती एस.व्ही.एन. भट्टी यांच्या सुट्टीकालीन पीठासमोर सुनावणी झाली. दरम्यान, सर्व प्रलंबित याचिकांप्रकरणी 8 जुलै रोजी एकत्रित सुनावणी घेण्यात येईल, असे न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, एनटीएची बाजू मांडणाऱया वकिलांनी ओएमआर शीट वेबसाईटवर अपलोड करण्यात आल्याचे सांगितले. तसेच प्रलंबित प्रकरणांसह नव्या याचिकाही सुनावणीसाठी लिस्ट करण्याची विनंतीही केली. तसेच 8 जुलैपर्यंत जे प्रश्न विचारण्यात येतील, तक्रारी येतील त्यांचे संक्षिप्त उत्तर देण्यात येईल, असेही एनटीएने न्यायालयाला सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;