केईएममधील शववाहिनी दीड महिन्यापासून बंद, तातडीने सुरू करण्याची शिवसेनेची मागणी

केईएममधील शववाहिनी दीड महिन्यापासून बंद, तातडीने सुरू करण्याची शिवसेनेची मागणी

पालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयाच्या शवागारापासून मृतदेह घरपोच पोहचवण्यासाठी असलेली शववाहिनी गेल्या दीड महिन्यापासून बंद आहे. यामुळे गोरगरीब कुटुंबातील मृत रुग्णांना घरी सोडण्यासाठी आर्थिक भुर्दंड पडत आहे. त्यामुळे बंद असलेली ही शववाहिनी तातडीने सुरू करावी, अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.

‘केईएम’ रुग्णालयात मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱयातून रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. त्यामुळे येथे रोज रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची मोठी गर्दी असते. मृत झालेल्या व्यक्तींना येथील शवागारात ठेवले जाते. या शवागारातून मृतदेह घरापर्यंत नेण्यासाठी शववाहिनी किंवा इतर वाहन वेळेवर मिळत नाही. त्यामुळे पालिकेने मृतदेह घरापर्यंत सोडण्यासाठी शववाहिनी उपलब्ध केली आहे. या शववाहिनीमुळे  नागरिकांना वेळेत सेवा मिळते, मात्र चालक नसल्याने शववाहिनी मागील दीड महिन्यापासून बंद ठेवण्यात आली आहे. शववाहिनी बंद असल्याने गरीब व गरजू नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळे चालक उपलब्ध करून शववाहिनी पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;