अकरावी कॉमर्सचा कटऑफ 94 टक्क्यांवर, झेवियर्स, रुईया वगळता आर्टस्ची गुणवत्ता यादी 90 टक्क्यांच्या खालीच

अकरावी कॉमर्सचा कटऑफ 94 टक्क्यांवर, झेवियर्स, रुईया वगळता आर्टस्ची गुणवत्ता यादी 90 टक्क्यांच्या खालीच

अकरावी कॉमर्स शाखेचा कटऑफ यंदा 94.4 टक्क्यांवर पोहोचला आहे. आर्टस्, सायन्स शाखेपेक्षा कॉमर्सच्या कटऑफमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाढ झाली आहे. पोदार कॉलेजचा कटऑफ गेल्या वर्षी 93 टक्क्यांवर होता तो यंदा 94.4 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रुईया कॉलेजच्या कटऑफमध्ये किंचित घट झाली असून आर्टस्चा कटऑफ 92.8 वरून 92.2 टक्क्यांवर आला आहे. साठये कॉलेजचा सायन्स शाखेचा कटऑफ 92.4 वरून यंदा 93 टक्क्यांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे झेवियर्स आणि रुईया वगळता मुंबईतील इतर कॉलेजांचा आर्टस्चा कटऑफ 90 टक्क्यांच्या खालीच राहिला आहे.

पहिल्या गुणवत्ता यादीसाठी 2 लाख 28 हजार 312 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी 1 लाख 30 हजार 650 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. यातील 55 हजार 655 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाले आहे. या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक आहे. पहिल्या पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश न घेणाऱया विद्यार्थ्यांना पुढील एका यादीसाठी प्रवेशप्रक्रियेतून बाद करण्यात येणार आहे. तर 20 हजार 783 विद्यार्थ्यांना दुसऱया आणि 14 हजार 448 विद्यार्थ्यांना तिसऱया पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे. विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेण्यासाठी 1 जुलै सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. दरम्यान पहिल्या गुणवत्ता यादीनुसार आतापर्यंत 8 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी संबंधित कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश निश्चित केले आहेत.

नवीन विद्यार्थी नोंदणी सुरू

अकरावी प्रवेशाच्या दुसऱया नियमित प्रवेशफेरीसाठी नवीन विद्यार्थी नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थी अर्जाचा भाग 1 भरू शकतात. तसेच दुसऱया फेरीसाठी अर्जाचा भाग 2 कॉलेज पसंतीक्रम भरण्यास 2 ते 5 जुलैपर्यंत मुदत दिली आहे.

पहिल्या गुणवत्ता यादीची स्थिती

एकूण जागा – 2,49,050
एकूण विद्यार्थी – 2,28,312
प्रवेश मिळाले – 1,30,650

पहिल्या गुणवत्ता यादीचा कटऑफ

एच आर – कॉमर्स 93
झेवियर्स – आर्टस् 93.4,
कॉमर्स 89.2, सायन्स 91.6
केसी – आर्टस् 86, कॉमर्स 91.4, सायन्स 87.6
जयहिंद – आर्टस् 89.6,
कॉमर्स 91.6, सायन्स 88.8
रुईया – आर्टस् 92.2,
सायन्स 93.4
पोदार – कॉमर्स 94.4
रुपारेल – आर्टस् 85.8,
कॉमर्स 90.6, सायन्स 91.8
एसआयईएस – कॉमर्स 87.2
साठये – आर्टस् 81,
कॉमर्स 89.2, सायन्स 90.6
डहाणूकर – कॉमर्स 90.8
भवन्स, अंधेरी – आर्टस् 82.6, कॉमर्स 89.8, सायन्स 85.4
मिठीबाई – आर्टस् 86.8,
कॉमर्स 91, सायन्स 89.4

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;