T20 WC 2024 : इंग्लंडला मात देत हिंदुस्थानचा फायनलमध्ये प्रवेश, जेतेपदासाठी आफ्रिकेशी होणार सामना

T20 WC 2024 : इंग्लंडला मात देत हिंदुस्थानचा फायनलमध्ये प्रवेश, जेतेपदासाठी आफ्रिकेशी होणार सामना

सेमीफायनलमध्ये इंग्लंडचा दारुण पराभव करत टीम इंडियाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. फायनलमध्ये टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असणार आहे. 29 जून रोजी बार्बाडोस येथे हा सामना होईल.

टीम इंडियाने विजयासाठी दिलेल्या 172 धावांचे आव्हान इंग्लंडला पेलवले नाही. फिरकी गोलंदाजीपुढे इंग्लंडचा संघ ढेपाळला आणि 16.4 षटकात 103 धावांवर बाद झाला. टीम इंडियाने 68 धावांनी विजय मिळवत फायनलमधील स्थान निश्चित केले. टीम इंडियाकडून अक्षर पटेल आणि कुलदीप यादवने प्रत्येकी 3, तर जसप्रीत बुमराहने 2 विकेट्स घेतल्या. अक्षर पटेल सामनावीर ठरला.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने कर्णधार रोहित शर्माच्या 57 आणि सूर्यकुमार यादवच्या 47 धावांचा बळावर निर्धारित षटकात 7 बाद 171 धावा केल्या. उपकर्णधार हार्दिक पंड्याने 23 आणि रवींद्र जडेजाने 17 धावांची मोलाची खेळी केली. विराट कोहली या लढतीतही खास कामगिरी करू शकत नाही. त्याने 9 धावा केल्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;