चार वर्षे खोदकाम, काँक्रिट-माती टाकून भूमिगत पार्किंग बिल्डर, कंत्राटदार मित्रासाठी ‘सीएम’कडून रेसकोर्सचा बळी; आदित्य ठाकरे यांचा घणाघात

चार वर्षे खोदकाम, काँक्रिट-माती टाकून भूमिगत पार्किंग बिल्डर, कंत्राटदार मित्रासाठी ‘सीएम’कडून रेसकोर्सचा बळी; आदित्य ठाकरे यांचा घणाघात

शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे रेसकोर्सची 120 एकर जागा पालिकेच्या ताब्यात आल्यानंतर कोस्टल रोडच्या जागेसह एकूण 300 एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र या ठिकाणी तब्बल चार वर्षे खोदकाम आणि काँक्रिट-माती टाकून भूमिगत पार्किंग करण्याचा ‘मिंधे’ सरकारचा डाव असल्याचा घणाघाती आरोप शिवसेना नेते युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला आहे. मुंबईकरांना थीम पार्क नको असताना कंत्राटदार ‘सीएम’ त्यांच्या बिल्डर-कंत्राटदार मित्रांसाठी रेसकोर्सचा बळी देत असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

आदित्य ठाकरे यांनी आज ‘एक्स’वर ‘मिंधे’ सरकारच्या डावाची पोलखोल केली आहे. कंत्राटदारा ‘सीएम’ना मुंबईतल्या क्लब आणि मोकळ्या जागांवर ताबा मिळवण्यासाठी तिथे चेअरमन आणि सदस्य म्हणून त्यांचीच माणसे घुसवायची असल्याचा डाव असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मुंबईकरांच्या हक्काची जागा आपल्या बिल्डर-कंत्राटदार मित्राला देण्यामागे कारण काय?, भाजप-मिंधे सरकार मुंबईचा इतका द्वेष का करते? मुंबईची ही लूट कशासाठी सुरू आहे? असे प्रश्नही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या पाठपुराव्यामुळे रेसकोर्सची जागा मिंधे सरकारच्या बिल्डर-कंत्राटदार मित्रांच्या घशात जाण्यापासून वाचली आहे. मात्र आता या ठिकाणी मिंधे-भाजप सरकार बांधकाम, काँक्रिटीकरण करणार असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

गद्दार व्यक्ती आश्वासने पाळेल का?
– आजवर अमाप देणार्‍या पक्षाच्याच पाठीत वार करून पळून गेलेल्या माणसावर मुंबईकर विश्वास ठेवतील का?, असा टोला आदित्य ठाकरे यांनी मिध्यांना लगावला आहे. मुळात गद्दार व्यक्ती आश्वासने पाळेल का? महाराष्ट्राचे नुकसान करणार्‍या या गद्दारांवर कोणी भरवसा ठेवेल का? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;