अगोदर रजिस्टर मॅरेज, त्यानंतर घातले एकमेकांना हार, सोनाक्षी सिन्हा आणि झहीरच्या लग्नातील ‘ते’ खास फोटो व्हायरल
सोनाक्षी सिन्हा हिने 23 जून 2024 रोजी झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. आता या लग्नाचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. कशापद्धतीने यांनी लग्न केले हे फोटोंवरून स्पष्ट होतंय.
सोनाक्षी सिन्हाच्या निर्णयामुळे तिचे कुटुंबिय नाराज असल्याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसली. मात्र, संपूर्ण कुटुंबिय सोनाक्षीच्या लग्नाला उपस्थित होते.
सोनाक्षी आणि झहीर इक्बाल यांनी सर्वात अगोदर रजिस्टर मॅरेज केले. यावेळी दोन्ही कुटुंबातील सदस्य उपस्थित दिसत आहेत. मॅरेज सर्टिफिकेटवर अंगठ्याचा ठसा देताना सोनाक्षी दिसत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List