Nanded news : नांदेड ते पुणे विमानसेवा आज पासून सुरू
पुणे विमानतळावर स्लॉट मिळत नसल्याने लांबणीवर पडलेल्या बहुप्रतिक्षीत नांदेड-पुणे विमानसेवेला गुरुवारपासून प्रारंभ झाला आहे, यासोबतच नांदेड-नागपूर विमानसेवेला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे
नांदेड येथे एप्रिल महिन्यापासून नवीदिल्ली-अहमदाबाद-बेंगलोर, तिरुपती अशी विमानसेवा सुरु झाली होती. नांदेड-हैद्राबाद विमानसेवा देखील सुरु करण्यात आली होती. नांदेडकरांची मागणी होती की, नांदेडहून पुण्यासाठी जाणार्या प्रवाशांची संख्या जास्त आहे, नांदेडची अनेक मुले पुण्यात शिकण्यासाठी, नौकरीसाठी आहेत, अनेकजण त्याठिकाणी स्थायिकही झाले आहेत. पुण्याला जाण्यासाठी नांदेडहून मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हल्स आहेत. रेल्वेचे वेळापत्रक देखील सोयीचे नाही. त्यामुळे अन्य विमानसेवेसोबत नांदेड-पुणे, नांदेड-मुंबई व नांदेड-नागपूर हि विमानसेवा सुरु करण्यात यावी, अशी मागणी अनेकांनी जिल्हाधिकार्यांकडे केली होती. अखेर 15 दिवसापूर्वी घोषित केल्याप्रमाणे स्टार एअरची नांदेड-पुणे सेवा आजपासून सुरु झाली आहे. 80 आसन क्षमतेचे हे विमान असून स्टार एअर कंपनीने हि विमानसेवा सुरु केली आहे. नांदेड ते पुणे 2800 रुपये असे भाडे असून, केवळ 40 मिनिटात हे विमान पुण्याला पोहंचेल. आज पहिल्याच दिवशी अनेक प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला. विमान प्राधिकरण अधिकार्यांनी आज 55 प्रवाशी या विमानाने गेल्याचे सांगितले. नांदेड ते नागपूर हि विमानसेवा देखील आजपासून सुरु झाली असून, विदर्भाला मराठवाड्याचे कनेक्शन आता मिळाले आहे. यामुळे प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List