सहा वर्षापूर्वी ऑर्डर केलेली स्लिपर मिळालीच नाही आणि अचानक… तरुणाने सांगितला किस्सा
अनेकदा ऑनलाईन ऑर्डर केल्यावर ती वस्तू दिलेल्या तारखेपेक्षा कधीतरी उशीरा मिळते, कधीतरी ऑर्डर करतो एक आणि हातात भलतीच वस्तू मिळते हे काही नवीन नाही. पण या ऑनलाईन ऑर्डर संदर्भात आणखी एक अनोखा प्रकार समोर आला आहे. एका तरुणाने ई कॉमर्स साईट flipkartवर मागवलेली स्लिपर एक दोन दिवस उशीरा नव्हे तर तब्बल सहा वर्षानंतर त्याला मिळाली आहे.त्याने त्याच्यासोबत घडलेली ही घटना सोशल मीडिया साईटवर शेअर केली आहे. त्यामुळे सध्या तो चर्चेत आला आहे.
अहसान खरबाई असे त्या तरुणाचे नाव आहे. त्याने दावा केला आहे की, 16 मे 2018 साली अहसानने स्पार्क्स कंपनीची एक चप्पल 485 रुपयांना ऑर्डर केली होती. त्याला ती चप्पल 20 मे रोजी मिळणार होती. मात्र त्याची डिलिव्हरी त्याला कधीच मिळाली नाही. अखेर सहा वर्षांच्य़ा प्रतिक्षेनंतर अचानक त्याला फ्लिपकार्टच्या कस्टमर केअरमनधून फोन येतो आणि त्याला त्याने सहा वर्षांपूर्वी मागवलेली स्लिपर मिळते.
After 6 yrs @Flipkart called me for this order
Asking me what issue I was facing pic.twitter.com/WLHFrFW8FV— Ahsan (@AHSANKHARBAI) June 25, 2024
अहसानच्या म्हणण्यानुसार, त्याला त्याची स्लिपर कधीच मिळाली नाही. मात्र त्या अॅपवर कायम आज डिलिव्हरी होईल असेच नोटीफिकेशन यायचे. अजूनही त्याच्या अॅपवर हेच स्टेटस दाखवत आहे. त्याने एक्सवर लिहीले आहे की, सहा वर्षानंतर फ्लिपकार्टने मला फोन केला आणि विचारले की, तुमच्या ऑर्डरसंदर्भात तुम्हाला काय अडचण येत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.

Comment List