‘मी 24 वर्षांपासून न्यायाधीश…’; पॉलिटिकल प्रेशरवर सरन्यायाधीश चंद्रचूड यांचं मोठं विधान

‘मी 24 वर्षांपासून न्यायाधीश…’; पॉलिटिकल प्रेशरवर सरन्यायाधीश चंद्रचूड यांचं मोठं विधान

सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी मोठे विधान केले आहे. सरकारकडून कोणत्याही दबावाला तोंड देण्याचा प्रसंग आपल्यावर आलेला नाही. मी 24 वर्षांपासून न्यायाधीश म्हणून काम करत आहेत. परंतु कधीही कोणत्याही राजकीय दबावाखाली काम केले नाही, असे सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले. ऑक्सफर्ड युनियनच्या प्रश्नोत्तराच्या सत्रात त्यांनी ही माहिती दिली. न्यायव्यवस्थेवर विशेषत: गेल्या काही वर्षांत कुठला राजकीय दबाव होता का? असा प्रश्न यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांना विचारण्यात आला होता.

राजकीय दबाव म्हणजे सरकारकडून कोणत्याही प्रकारचा दबाव तुम्हाला म्हणायचा असेल, तर तुम्हाला स्पष्टच सांगतो. मी 24 वर्षे न्यायाधीश आहे. सरकारच्या कोणत्याही दबावाला मला कधीच सामोरे जावे लागले नाही, असे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी स्पष्ट केले. लाइव्ह लॉने हे वृत्त दिले आहे.

तुमचा अर्थ व्यापक राजकीय दबाव असेल, तर न्यायाधीशाला त्याच्या निर्णयाच्या राजकीय परिणामाची जाणीव असते. तसेच आपल्या निर्णयाचे काय राजकीय परिणाम होणार आहेत, याची जाण न्यायाधीशांना असली पाहिजे, असे सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले.

सोशल मीडिया एक मोठी समस्या बनत चालला आहे. प्रत्येकजण स्वतःला पत्रकार समजू लागला आहे. त्याची सर्वाधिक बळी हे न्यायाधीश ठरत आहेत. मी कधी बोललो नसेल, अशी वक्तव्य सोशल मीडियावर दिसून येतात, असे सांगत सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी चिंता व्यक्त केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;