अरमान मलिकच्या दुसऱ्या पत्नीची कमाई किती? संपत्तीचा आकडा कोट्यवधींमध्ये
बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या सिझनमुळे प्रेक्षकांचं दररोज भरभरून मनोरंजन होतंय. यंदाच्या सिझनमध्ये युट्यूबर अरमान मलिक आणि त्याच्या दोन्ही पत्नी जोरदार चर्चेत आहेत. अरमान त्याच्या दोन्ही पत्नींसोबत बिग बॉसच्या घरात सहभागी झाला आहे. पायल आणि कृतिका या त्याच्या दोन्ही पत्नींचीही सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.
अरमान मलिकची दुसरी पत्नी कृतिकासुद्धा युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. तीसुद्धा दर महिन्याला तगडी कमाई करते. कृतिकाचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 85 लाख फॉलोअर्स आहेत.
कृतिकाच्या तुलनेत अरमान मलिकचे फॉलोअर्स कमी आहेत. अरमानला इन्स्टाग्रामवर फक्त 40 लाख लोक फॉलो करतात. कृतिकाच्या फॉलोअर्सचा आकडा त्याच्यापेक्षा दुप्पट आहे. फेसबुकबद्दल बोलायचं झालं तर कृतिकाचे फेसबुकवर 2.3 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List