वीज पुरवठा खंडित झाल्याने 500 कोंबड्यांचा मृत्यू; तब्बल दीड लाखांचे नुकसान, शेतकऱ्याला हवी भरपाई
>> सूरज बागडे, भंडारा
शेतीपूरक कुक्कुटपालन व्यवसायाला दोन लाख ट्रॉन्सफार्मरचे भरून 24 तास वीज पुरवठा संलग्न केला असताना सुद्धा सोनपूरी येथील शेतकऱ्याच्या पोल्ट्री फार्ममधील विद्यृत पुरवठा सतत सहा तास खंडित राहिल्याने तब्बल 500 च्या वर कोंबड्यांचा उष्णतेमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबद तक्रारदार शेतकऱ्याने या महावितरणच्या दिरंगाईमुळे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आणि हे नुकसान भरपाई भरून देण्याची मागणी तक्रारदार शेतकऱ्याने केली आहे. अन्यथा ग्राहक मंच न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.
सोनपूरी येथील शेतकरी गिरीश प्रकाश कठाणे यांनी बँक ऑफ इंडिया मधून 12 लाखांचे कर्ज घेऊन गावीच शेतीपूरक कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला.अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता विद्यृत पुरवठा खंडित झाला. कठाणे यांनी एकोडी महावितरणला फोन केला की येथे 24 तास वीज पुरवठा संलग्न केला आहे व उष्णतेने पक्ष्यांची दयनीय अवस्था होत मृत्यू पावत आहेत.लाईट गेल्यानंतर येथे त्यांचे ओजल पोल्ट्री फार्मवर कर्मचाऱ्यांनी उष्णतेमुळे पक्षी वाचविण्यासाठी त्यांना थंड पाण्यात टाकून काढणे ही क्रिया करून कोंबड्या वाचविण्यासाठी अतोनात प्रयत्न केले पण ते प्रयत्न विफल ठरले.यावर या शेतकऱ्याच्या फोनवर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत वीज सुरू होणार नाही असे शेतकऱ्यास फोनवर सांगितले.यात 6 तासांपेक्षा जास्त अवधीने वीज पुरवठा खंडीत झाला व बुधवारला 472 कोंबड्या आणि गुरूवार 27 ला पहाटे 57 कोंबड्यांचा उष्णतेमुळे मृत्यू झाला.शेतकरी व कुक्कुटपालन व्यवसायिक गिरीश प्रकाश कठाणे यांनी महावितरणला दोन लाख रूपये भरून ट्रॉन्सफार्मर बसविला जेणेकरून या कुक्कुटपालन व्यवसायाला 24 तास वीज अबाधित राहील.पण महावितरणच्या दिरंगाईमुळे पाचशेच्या वर कोंबड्यांचा उष्णतेमुळे मृत्यू झाला.यात शेतकऱ्याचे एकूण दीड लाख रुपयांचे नुकसान झाले सदर नुकसान भरपाईची मागणी शेतकरी गिरीश प्रकाश कठाणे यांनी महावितरणकडे केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List