Anant Ambani Radhika Merchant Wedding : चांदीचं मंदिर, सोन्याची मूर्ती.. अनंत-राधिकाच्या लग्नाची पत्रिका पाहिलीत का ? फोटो व्हायरल

Anant Ambani Radhika Merchant Wedding : चांदीचं मंदिर, सोन्याची मूर्ती.. अनंत-राधिकाच्या लग्नाची पत्रिका पाहिलीत का ? फोटो व्हायरल

देशातील नामवंत व्यक्ती आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी हे नेहमीच चर्चेत असतात. त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं पुढील महिन्यात लग्न होणार असून त्याची धूम-धडाक्यात तयारी सुरू आहे. त्यांच्या लग्नापूर्वी काही फंक्शन्स मार्च महिन्यात गुजरातमधील जामनगर येथे पार पडली. तर गेल्या महिन्यात 29 मे ते 1 जून रोजी इटली येथे क्रूझवरही अंबानी कुटुंबातर्फे मोठी पार्टी देण्यात आली. या सोहळ्यात अंबानी, मर्चंट कुटुंबासह सलमान खान, रणवीर सिंग, रणबीर कपूर, आलिया भट्ट अशा अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. एकंदरच अनंत-राधिकाचं लग्न खूप चर्चेत आहे.

येत्या 12 जुलै रोजी अनंत आणि राधिका यांचा विवाह पार पडणार असून देशभरातील नामवंत व्यक्ती, उद्योजक, सेलिब्रिटी या विवाहासाठी उपस्थित राहणार आहेत. त्याच दरम्यान अनंत-राधिकाच्या लग्नपत्रिकेची झलक समोर आली असून ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. इन्स्टाग्रमावरही त्याचे बरेच व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

कशी आहे अनंत-राधिकाची लग्नपत्रिका ?

या लग्नपत्रिकेचा एक व्हिडीओ समोर आला असून तो व्हिडीओ सुरू होताच एक रेड कलरचा बॉक्स दिसतो. तो उघडल्यावर त्यात आतमध्ये एक चांदीचं मंदिर दिसतं. त्या मंदिरात हिंदू देव-देवतांच्या काही सोन्याच्या मूर्तीदेखील पाहायला मिळत आहेत. या लग्नाच्या आमंत्रणासोबत एक चांदीची पेटीही होती.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची पत्रिका ही भक्ती आणि परंपरेचा मेळ असलेली आहे. या शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये बॉक्स उघडताच चांदिचे मंदिर दिसते. या मंदिराच्या चार बाजूला चार देवांच्या मूर्ती विराजमान आहेत. तर दुसऱ्या एका बॉक्समध्ये लग्नपत्रिका असून त्यात विवाहाबद्दलची सर्व माहिती नमूद करण्यात आली आहे. बॉक्स उघडताच त्यातल्या एका डिझायनर कापडावर ‘अ’ आणि ‘र’ म्हणजेच अनंत आणि राधिका यांची नावं लिहून विवाहाची माहिती दिली आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या या लग्नपत्रिकेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.युजर्सनी देखील या व्हिडीओवर तूफान कमेंट्स केल्या असून जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

लग्नापूर्वी अंबानी कुटुंबाने नातलगांच्या, मित्रांच्या घरी जाऊन निमंत्रण देण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसापूर्वीच नीता अंबानी आपल्या मुलाच्या लग्नाचे निमंत्रण बाबा विश्वनाथ यांना देण्यासाठी काशीत आल्या होत्या. त्यांचा तेथील व्हिडीओही व्हायरल झाला. आतापर्यंत अजय देवगण, अक्षय कुमार यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना लग्नाचे निमंत्रण देण्यात आलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;