हिंदू-मुस्लीम यांच्यात काय फरक? नाना पाटेकरांनी मांडलं मोठं मत
अभिनेते नाना पाटेकर हे त्यांच्या दमदार अभिनयासोबतच बेधडक वक्तव्यांसाठीही ओळखले जातात. नानांनी त्यांच्या करिअरमध्ये बरेच हिट चित्रपट दिले आहेत. प्रत्येक भूमिकेत ते जीव ओतून काम करतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते विविध मुद्द्यांवर मोकळेपणे व्यक्त झाले.
या मुलाखतीत नानांना हिंदू-मुस्लीम यांच्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. "तुम्हाला हिंदू-मुस्लीममध्ये काही फरक वाटतो का?" असं विचारलं असता ते म्हणाले, "खरंतर मला समजून घ्यायचं आहे. इतकी वर्षे झाली आहेत, पण मलाही अद्याप हा फरक समजला नाही."
"मला आजपर्यंत कधीच फरक जाणवला नाही. सर्वांत आधी देश असला पाहिजे, त्याच्याशिवाय काहीच नाही. त्यानंतर माझी नाती आणि धर्म, पण सर्वांत आधी देश", असं मत नानांनी मांडलं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List