आठवी पास भाजपच्या माजी आमदाराने केले पदवीधर मतदारसंघात मतदान? नरेंद्र मेहतांनी स्वत: शेअर केला फोटो
मीरा भाईंदरचे भाजपचे आठवी पास असलेले माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी कोकण पदवीधर मतदारसंघात मतदान केल्याचे समोर आले आहे. नरेंद्र मेहता यांनी बोटाला शाई लावलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांच्या या फोटोमुळे आता पुन्हा एकदा भाजपची मतदान केंद्रावरची काळाकांडी समोर आली आहे.
नरेंद्र मेहता यांनी त्यांच्या निवडणूकीच्या प्रतिज्ञा पत्रात ते आठवी पास असल्याचे लिहले होते. बुधवारी पार पडलेल्या पदवीधर मतदारसंघात नरेंद्र मेहता यांनी त्यांच्या पत्नीसह मतदान केल्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोत ते शाई लावलेलं बोट दाखवताना दिसत आहेत. त्यांच्या या फोटोवर प्रतिक्रीया देताना नेटकऱ्यांनी आठवी पास व्यक्ती पदवीधर मतदारसंघात कशी काय मतदान करू शकते असा सवाल केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List