शेतकरी विरोधी महायुती सरकारचा धिक्कार असो, विधानभवनाबाहेर विरोधक आक्रमक
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळ परिसरात विरोधक शेतकरी प्रश्नावर आक्रमक झाले. विरोधी पक्षाच्या आमदारांनी आंदोलन करत ‘ शेतकरी विरोधी महायुती सरकारच्या धिक्कार असो’ म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.
मुंबई येथे विधानसभेचे विरोधी पक्षनेते श्री.विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केले.
शेतकऱ्यांची वीज बिल माफ केली पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात बळीराजाचा बळी, कोरडा डोळा कोरडी विहीर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कोण देणार धीर, शेतकरी विरोधी महायुती सरकारचा धिक्कार असो, शेतकरी उपाशी महायुती सरकार तुपाशी, अशा विविध घोषणा लिहिलेले फलक हाती घेत टक्केवारी सरकार हाय हाय, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ झालेच पाहिजे.अशी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List