रस्ते खराब असतील तर टोल घेणे चुकीचे; नितीन गडकरी यांनी रस्ते कंत्राटदारांना सुनावले

रस्ते खराब असतील तर टोल घेणे चुकीचे; नितीन गडकरी यांनी रस्ते कंत्राटदारांना सुनावले

रस्ते खराब असूनही टोल आकारणाऱया पंत्राटदारांना पेंद्रीय रस्ते आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सुनावले. रस्ते खराब असतील तर लोक नाराज होणारच. अशा रस्त्यांवर टोल घेणे चुकीचेच आहे. येत्या काळात तब्बल 5 हजार किलोमीटरच्या रस्त्यांवर सॅटेलाईटच्या सहाय्याने टोल आकारण्याचे सरकारचे धोरण आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यशाळेत गडकरी बोलत होते.

या कार्यशाळेत गडकरी यांनी उघडपणे आपली भूमिका मांडली. जर तुम्ही चांगल्या दर्जाचे रस्ते आणि सुविधा देत नसाल तर तुम्ही टोल आकारू शकत नाही. आपण रस्त्यांचा वापर करण्याचे शुल्क आकारण्याची आणि आपले हितसंबंध जपण्याची नेहमीच घाई करतो, असेही नितीन गडकरी म्हणाले. रस्त्यांवर खड्डे, चिखल आणि अतिशय खराब रस्ते असतील तर अशा रस्त्यांसाठी टोल आकारण्यात येत असतील तर लोकांची नाराजी पत्करावी लागणारच. सोशल मीडियावर तसेच माझ्याकडे खराब रस्त्यांबद्दलच्या असंख्य तक्रारी आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. जर सरकार उत्तम दर्जाचे रस्ते देत असेल तर त्या रस्त्यांसाठी टोल आकारणे योग्य आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

टोल कलेक्शन 10 हजार कोटींनी वाढवण्याचे ध्येय
जीएनएसएस म्हणजेच जागतिक नेव्हीगेशन उपग्रह प्रणालीच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक टोल आकारण्यात येईल. या माध्यमातून टोल कलेक्शन कमीत कमी 10 हजार कोटींनी वाढवण्याचे धअयेय असेल, असे गडकरी यांनी सांगितले. देशात 2023-24 मध्ये टोल कलेक्शन 35 टक्क्यांनी वाढून तब्बल 64,809.86 कोटींवर पोहोचले. या महिन्याच्या सुरुवातीलाच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उपग्रहावर आधारित इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शनसाठी जगभरातून निविदा मागवल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले.

टोलनाक्यांवरील रांगा कमी होणार
जीएनएसएसवर आधारित इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन यंत्रणा राबवली तर टोलनाक्यांवरील वाहने पटापट पुढे सरकतील. सुरुवातीला हायब्रीड मॉडेलचा वापर करण्यात येईल. राज्य परिवहनच्या वाहनांना महामार्गावरील टोलमधून सवलत द्यायला हवी, असेही गडकरी म्हणाले.

लांबच लांब रांगा लागतात, त्याकडेही लक्ष द्या
टोलनाक्यांवर प्रचंड लांबच लांब रांगा लागतात याबद्दलही लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. अनेक टोलनाक्यांवर याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येते. याबद्दल अनेक तक्रारी येतात. याकडेही राष्ट्रीय महामार्ग संस्थांच्या अधिकाऱयांनी लक्ष द्यायला हवे, असेही गडकरी म्हणाले. तसेच अशी यंत्रणा उभारा जेणेकरून तक्रारी आल्या की त्या तत्काळ सोडवल्या जातील आणि नागरिकांना चांगल्या सुविधा मिळतील, असेही ते म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;