फॉक्सकॉन कंपनीत विवाहित महिलांना नो एन्ट्री!

फॉक्सकॉन कंपनीत विवाहित महिलांना नो एन्ट्री!

जगभरात स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारल्या जातात. हिंदुस्थानात तर महिलांना 33 टक्के आरक्षणसुद्धा मंजूर करण्यात आले. परंतु तामीळनाडूमधील फॉक्सकॉन कंपनीत महिलांची गुणवत्ता पाहिली जात नाही, तर केवळ ती विवाहित असल्यामुळे तिला नोकरी दिली जात नाही, अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. 20 वर्षीय दोन महिला पंपनीत काम मिळेल या आशेने गेल्या होत्या. परंतु त्यांना गेटवरच विवाहित की अविवाहित असा प्रश्न सुरक्षा रक्षकांकडून विचारण्यात आला. महिलांनी विवाहित असे उत्तर देताच त्यांना आत जाऊ दिले नाही. त्यांना गेटवरूनच माघारी पाठवले, असा दावा एका इंग्रजी मीडियाने केला आहे. कंपनीतील काही कर्मचाऱ्यांनी त्यांची ओळख उघड न करण्याच्या अटीवर कारखान्यात विवाहित महिलांना रोजगार दिला जात नाही, यावर शिक्कामोर्तब केले. मात्र फॉक्सकॉनचे हे कायमचे धोरण नाही, अशीही माहिती समोर आली आहे. जेव्हा उत्पादन वाढलेले असते तेव्हा मनुष्यबळाची कमतरता भासू लागते. अशा वेळी या नियमात शिथिलता आणली जाते, अशी माहिती फॉक्सकॉनच्या इतर माजी अधिकाऱ्यांनी दिली.

– विवाहित महिलांवर अविवाहित महिलांपेक्षा कुटुंबाच्या अधिक जबाबदाऱया असतात. त्यामुळे आम्ही अविवाहित महिलांना रोजगारासाठी प्राधान्य देत़ो आम्हाला हे धोरण तोंडी सांगितले गेले होते. भरती करणाऱया एजन्सींना आम्ही हेच तोंडी सांगितले, असे एका माजी अधिकाऱयाने सांगितले.

– आम्ही बसस्टँडपासून कारखान्यापर्यंत जाण्यासाठी रिक्षा केली होती. पंपनीत विवाहित महिलांना रोजगार दिला जात नाही, अशी माहिती रिक्षावाल्यानेही आम्हाला दिली होती. आम्ही कारखान्याच्या गेटवर पोहोचलो आणि चौकशी केली. तेव्हा मात्र आमचा भ्रमनिरास झाला, असे या महिलांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;