सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक आवश्यक; नवे दूरसंचार विधेयक लागू
नवीन दूरसंचार विधेयक 2023 आजपासून अंशतः लागू झाले. या विधेयकात सिम कार्डसंदर्भातील नियक कडक केले आहेत. बनावट सिम खरेदी आणि विक्री केल्यास 3 वर्षांचा तुरुंगवास आणि 50 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. सिम विकण्यापूर्वी ग्राहकांचा बायोमेट्रिक डेटा घ्यावा लागेल. त्यानंतरच सिम कार्ड जारी होईल. एका ओळखपत्रावर 9 पेक्षा जास्त सिम कार्ड असल्यास 50 हजारांपेक्षा जास्त दंड बसेल. दुसऱयांदा असेच कृत्य केल्यास दोन लाख रुपये दंड बसेल.
नवे विधेयक दूरसंचार क्षेत्राचे नियमन करणाऱया 138 वर्ष जुन्या टेलिग्राफ कायद्याची जागा घेईल. याशिवाय हे विधेयक वायरलेस टेलिग्राफ कायदा 1933 आणि टेलिग्राफ वायर्स कायदा 1950 ची जागा घेईल. ते ट्राय कायदा 1997 मध्ये सुधारणादेखील करेल.
कॉल टॅपिंग गुन्हा
परवानगी शिवाय टेलिकॉम नेटवर्क डेटा एक्सेस करणे, कॉल टॅपिंग करणे किंवा रेकॉर्ड करणे गुन्हा समजला जाईल. त्यासाठी तीन वर्षांची शिक्षेची तरतूद आहे.
आपत्कालीन स्थितीत नेटवर्क सरकारच्या ताब्यात
हे विधेयक सरकारला राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव कोणतीही दूरसंचार सेवा किंवा नेटवर्क ताब्यात घेण्यास, व्यवस्थापित करण्यास किंवा निलंबित करण्यास अनुमती देईल. आपत्कालीन स्थितीत जर एखाद्या दूरसंचार पंपनीला दूरसंचार नेटवर्क चालवायवचे असेल तर किंवा सेवा द्यायची असेल तर पंपनीला आधी सरकारद्वारे अधिकृत करून घ्यावे लागेल.
सिमची कॉपी म्हणजे गुन्हा
सिम कार्डचे क्लोन करणे किंवा कुणा दुसऱयाच्या सिमचा दुरुपयोग करणे, दंडनीय अपराध समजला जाईल. सिम कार्ड क्लोनिंगची प्रकरणे वाढली आहेत. सिम कार्डचे क्लोनिंग करून लोकांच्या खात्यांतून पैसे काढण्याचे प्रमाण वाढले आहे.
डू नॉट डिस्टर्ब
टेलिकॉम पंपन्या युजर्सला डू नॉट डिस्टर्ब
(डीएनडी) सेवा नोंदणी करण्याचा पर्याय देतील. जर कुणी युजर्सने डू नॉट डिस्टर्बची सर्व्हिस सुरू केली असेल आणि तरीही त्याला प्रमोशनल मेसेज किंवा कॉल गेले, तर हे नियमांचे उल्लंघन असेल. त्यावर कारवाई होईल.
स्पेक्ट्रमचे वाटप नव्या पद्धतीने
नव्या विधेयकानुसार, सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवेसाठी स्पेक्ट्रमचे वाटप प्रशासकीय पद्धतीने होईल. त्याचा लिलाव होणार नाही. देशाबाहेरील पंपन्यांनाही स्पेक्ट्रम दिले जाईल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List