नवीन फौजदारी कायद्यांविरोधात 1 जुलै रोजी ब्लॅक डे; प. बंगाल, अंदमान-निकोबारच्या वकिलांचे आंदोलन
भारतीय दंड संहिता, पुरावा कायदा आणि फौजदारी प्रक्रिया संहिता यांची जागा घेणाऱया तीन नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीच्या विरोधात पश्चिम बंगालच्या बार कॉन्सिलने 1 जुलै रोजी ब्लॅक डे निषेध आंदोलन जाहीर केले आहे.
हे तिन्ही कायदे जनविरोधी, लोकशाहीविरोधी आणि जुलमी, कठोर आहेत आणि त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा त्रास होणार आहे, असे ठरावात म्हणत पश्चिम बंगालच्या बार कॉन्सिलने या तिन्ही जनविरोधी कायद्यांविरोधात एकमताने संमत केलेल्या ठरावात तीव्र निषेध व्यक्त केला आहे. पश्चिम बंगाल आणि अंदमान निकोबार बेटावरील सर्व वकील 1 जुलै रोजी न्यायालयीन कामकाजात सहभाग न घेता निषेध रॅली काढणार आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List