पत्रकारांनी विचारले, मंडीसाठी काय व्हिजन, कंगना म्हणाल्या माझा सिनेमा येतोय
देशाला 2014 साली स्वातंत्र्य मिळाले, यासारखी वादग्रस्त विधाने करून चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्री, नवनिर्वाचित खासदार कंगना रनौत यांनी ज्या मतदारसंघातून त्या निवडून आल्या त्या मतदारसंघासाठी काय करणार या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचे भलतेच उत्तर दिले. त्यांच्या उत्तरावरून आता त्यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. आगामी सिनेमाचे प्रमोशन करण्याच्या नादात त्या भलतेच बोलून गेल्या.
तुम्ही आज खासदारकीची शपथ घेतली, तुमचे मंडीसाठी काय व्हिजन आहे, असा सवाल पत्रकारांनी विचारला. यावर कंगना रनौत म्हणाल्या. माझा ‘इमर्जन्सी’ नावाचा सिनेमा 6 सप्टेंबरला येतोय. या सिनेमातून त्यांचे काळे कारनामे बाहेर येतील. संविधानाच्या प्रती घेऊन विरोधक आवाज उठवत आहेत, पण माझा सिनेमा येतोय. माझा सिनेमा थांबवण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले. मी माझे दागिने विकून सिनेमा बनवला, असे त्या म्हणाल्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List