इरान्ना कोंगलवार कुटुंबासह पसार! दिल्लीतल्या गंगाधरचाही ठावठिकाणा नाही
‘नीट’ घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल झालेला उमरगा येथील शिक्षक इरान्ना कोंगलवार लातूर पोलिसांच्या तोंडाला काळे फासून कुटुंबासह पसार झाला आहे. शनिवारपासून कुलूप लावलेल्या त्याच्या घरासमोर पोलीस घिरटय़ा घालत आहेत.
देशभरात गाजत असलेल्या ‘नीट’ पेपरफुटीचे धागेदोरे थेट शिक्षण पंढरी असलेल्या लातूरपर्यंत पोहोचले. या प्रकरणात शिक्षक जलील खान पठाण याला पोलिसांनी दोन दिवसांपूर्वीच ताब्यात घेतले. त्यानंतर काल रात्री संजय जाधव यालाही अटक करण्यात आली. या दोघांनाही 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या घोटाळय़ातील आर्थिक व्यवहाराचा सूत्रधार इरान्ना कोंगलवार याला अटकेची कुणकुण लागताच तो शनिवारीच कुटुंबासह पसार झाला.
दरम्यान, लातुरात पेपरफुटी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याचे कळताच गुडगाव परिसरात राहणारा गंगाधर तेथून पसार झाला असून त्याच्या शोधासाठी लातूर पोलीस उत्तराखंडात गेल्याचे वृत्त आहे.
बीडमधील दोन शिक्षकांची चौकशी
‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात लातूरनंतर आता बीड रडारवर आले आहे. या प्रकरणात जिल्हय़ातील दोन शिक्षकांना नांदेड एटीएसने चौकशीसाठी बोलावल्याची माहिती आहे. माजलगाव तालुक्यातील हे दोन शिक्षक असल्याचे सांगण्यात आले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List