विषारी दारूच्या मुद्दय़ावरून गदारोळ, तामीळनाडूत विरोधी पक्षाचे सर्व 62 आमदार निलंबित
तामीळनाडूतील कल्लाकुरिची जिह्यात विषारी दारू प्यायल्याने 63 जणांचा मृत्यू झाला. यावरून तामीळनाडू विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांत जोरदार हंगामा झाला. विषारी दारू प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत सभागृहाचे कामकाज रोखून धरणाऱया विरोधी पक्षनेते एडप्पादी के. पलानीस्वामी यांच्यासह अण्णा द्रमुकच्या सर्वच्या सर्व 62 आमदारांना पावसाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले.
विषारी दारूच्या मुद्दय़ावरून आज तामीळनाडू विधानसभेत जोरदार हंगामा झाला. मंगळवारी याच मुद्दय़ावरून विरोधी पक्षातील काही आमदारांना दिवसभरासाठी निलंबित केले होते. त्यानंतर आज अण्णा द्रमुकच्या सर्व आमदारांनी काळे कपडे परिधान करून सभागृहात प्रवेश केला आणि दारुकांडाचा मुद्दा लावून धरला. सभागृहात गोंधळ घालणाऱया आमदारांना वारंवार ताकीद देऊनही ते शांत होत नसल्याने विधानसभा अध्यक्ष एम. अप्पावू यांनी अण्णा द्रमुकच्या सर्व 62 आमदारांना 29 जूनपर्यंत निलंबित केले.
त्यांना चर्चा नाही, राजकारण करायचेय ः स्टॅलिन
विषारी दारूच्या मुद्दय़ावर सरकार सभागृह चर्चेसाठी तयार होते. मात्र, विरोधकांना राजकारण करायचे होते, चर्चा करायची नव्हती, असा दावा मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List