पेपर लीकचा मास्टरमाइंड एनडीएचा आमदार, काँग्रेसचा गंभीर आरोप; योगी आदित्यनाथांसोबतचे फोटो व्हायरल
नीट पेपर लीक प्रकरणात रोज नवीन घडामोडी समोर येत आहेत. नीट पेपरफुटीचा मास्टरमाइंड उत्तर प्रदेशातील योगी सरकारमधील सहकारी पक्षाचा आमदार असल्याचा दावा काँग्रेसने केला असून त्याचे योगी आदित्यनाथ यांच्यासोबतचे पह्टोही एक्सवरून व्हायरल करण्यात आले आहेत. बेदी राम असे या मास्टरमाइंडचे नाव असून देशभरात पेपर लीक करून त्यातून पैसे कमावणे हाच त्याचा मुख्य धंदा असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
देशात कुठलाही पेपर पह्डू शकतो, असा दावा एनडीएचा आमदार बेदी राम याने केला असून तो पेपरफुटी प्रकरणीच याआधीही तुरुंगात गेला आहे, असेही काँग्रसने म्हटले आहे. बेदी राम भाजपचा अत्यंत जवळचा विश्वासू आमदार असल्याचा दावाही काँग्रेसने केला आहे. दरम्यान, बिहार आणि उत्तर प्रदेशातून नीट पेपरफुटी प्रकरणी रोज बातम्या येत आहेत. आज पाटणाच्या विशेष सीबीआय न्यायालयाने नीट पेपरफुटीतील आरोपी बलदेव कुमार ऊर्फ चिंटू आणि मुकेश कुमार या दोघांना 3 दिवसांची सीबीआय कोठडी देण्यात आली. बिहार पोलिसांच्या तपासानुसार चिंटूला मोबाईलवर प्रश्नपत्रिका मिळाल्या होत्या. चिंटूने सांगितल्यानुसार त्याचा साथीदार पिंटू याने प्रश्नपत्रिकेच्या प्रती काढून त्या 20 ते 25 विद्यार्थ्यांना रट्टा मारण्यासाठी दिल्या होत्या.
– कोलकात्यात नीट यूजी परीक्षेत विद्यार्थ्यांना मेरीट लिस्टमध्ये आणण्याचे आमिष देऊन पैसे घेतल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीने विद्यार्थ्यांच्या पालकांकडून 5 ते 12 लाख रुपये वसूल केल्याचीही माहिती आहे.
कोण आहे बेदी राम?
बेदी राम 2022मध्ये सुहेलदेव भारतीय समाज पार्टीतून आमदार म्हणून निवडून आला. त्याने पत्नीलाही अपक्ष उभे करून सरपंच म्हणून निवडून आणले. या बेदी रामचे आता पेपर लीक प्रकरणात नाव चर्चेत आहे. उत्तर प्रदेशचे पॅबिनेट मंत्री ओमप्रकाश राजभर यांचा खास म्हणून बेदी रामचे नाव घेतले जाते. पेपरफुटी प्रकरणातील मास्टरमाइंड विजेंद्र गुप्ता याने बेदी राम हा देशातील सर्वात मोठा पेपर लीक करणारा माफिया असल्याचे म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये ही माहिती समोर आली. 2014मध्ये बेदी रामला एका पेपरफुटी प्रकरणात अटक झाली होती. रेल्वेपासून ते बँक आणि अनेक परीक्षांचे पेपर लीक प्रकरणी बेदी रामचे नाव सातत्याने चर्चेत राहिले आहे.
पैसे घेऊन नोकरी लावायचा
नोकरीसाठी पैसे देणाऱया एका व्यक्तीने बेदी रामचे स्टिंग ऑपरेशन केले होते. याबाबतचा व्हिडीओ वृत्तवाहिन्यांच्या हाती लागला. या व्हिडीओत बेदी राम पैसे घेऊन नोकरीला लावत असल्याचा दावा करताना दिसत आहे. परीक्षेत पास करणे ही आमची जबाबदारी आहे. त्यानंतर जर परीक्षा रद्द झाली तर त्याच्याशी आमचे काही देणेघेणे नाही, असेही बेदी राम म्हणताना दिसत आहे. हा व्हिडीओ बेदी राम आमदार झाल्यानंतरचा असल्याचे म्हटले जात आहे.
कारवाई का नाही?
बेदी राम उघडपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे नाव घेऊन कॉलर टाईट करत सगळीकडे फिरत असून माझे कुणीही काहीही वाकडे करू शकत नाही. पेपर लीक होणार आणि हे कुणीही रोखू शकत नाही, असेही तो म्हणतोय. तरीही कारवाई का होत नाही?
बेदी राम पेपर लीक करत होता हे सर्वांना माहीत होते. तरीही एनडीएने कारवाई का केली नाही, त्याला एनडीएत का ठेवले?
नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाचा या पेपरफुटीच्या मास्टरमाइंडला पाठिंबा का आहे?
पेपर लीक जिथे भाजपाचे कनेक्शन तिथे
‘पेपर लीक जिथे भाजपाचे कनेक्शन तिथे’ असा नारा घेऊन आता एनडीए सरकारला घेरण्यासाठी इंडिया आघाडी सज्ज झाली आहे. पेपरफुटी प्रकरणात बेदी रामचे नाव चर्चेत आल्यानंतर आता एनडीए सरकार त्याच्यावर काय कारवाई करणार, उत्तर प्रदेशात त्याच्या पार्टीच्या टेकूवर उभे असलेले योगी आदित्यनाथ सरकार काय भूमिका घेणार, असे सवाल आता उपस्थित झाले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List