मुंबईत 31 ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका, हजारो रहिवाशांचा जीव टांगणीला

मुंबईत 31 ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका, हजारो रहिवाशांचा जीव टांगणीला

पावसाळा सुरू झाला असताना मुंबईत तब्बल 31 ठिकाणी अतिधोकादायक दरडी कोसळण्याचा धोका आहे. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच याबाबत आज माहिती दिली. या दरडींमुळे हजारो रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. दरम्यान, धोकादायक दरडी कोसळू नयेत यासाठी पालिका या वर्षी अत्याधुनिक स्वित्झर्लंड तंत्रज्ञानाच्या जाळय़ा बसवत आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी घाटकोपर भागातील असल्फा व्हिलेज-हनुमान टेकडी येथे भेट देऊन मुंबईतील धोकादायक दरडींची माहिती दिली. 2001 मध्ये याच हनुमान टेकडी येथे दरड कोसळून तब्बल 72 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यानंतरही मुंबईत दरवर्षी विशेषतः पूर्व उपनगरात दरडी कोसळून दुर्घटना होत आहेत. त्यामुळे आता पालिकेच्या माध्यमातून दरडी कोसळण्याचा धोका टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. धोकादायक दरडींच्या ठिकाणी मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गाच्या धर्तीवर सेफ्टी नेट बसवण्यात येत आहेत.

– दरडींच्या सुरक्षेसाठी स्वीस तंत्रज्ञान उपयोगात आणण्यात येत आहे. या तंत्रज्ञानानुसार खडकाच्या आत आठ मीटर खोल सुरक्षित पद्धतीने ही नेट बसवली जाते. त्यामुळे येथील सुरक्षितता अधिक वाढते. मुंबईत धोकादायक ठिकाणे असलेल्या सर्व 31 ठिकाणी हे काम सुरू आहे. ‘दरडमुक्त मुंबई’ या उद्देशाने हे काम सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;