मोदी आणि राहुल गांधी  यांचे हस्तांदोलन गाजले, आवाजी मतदानाने अध्यक्षपदी निवड

मोदी आणि राहुल गांधी  यांचे हस्तांदोलन गाजले, आवाजी मतदानाने अध्यक्षपदी निवड

पंतप्रधान नरेंद्र मोदी व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभेत एकमेकांना हस्तांदोलन करत स्मितहास्यही केले. हे दुर्मिळ चित्र लोकसभा अध्यक्ष पदाच्या निवडी वेळी पाहायला मिळाले. बिर्ला यांना सभागृहातून आसनापर्यंत घेऊन जाण्यासाठी पंतप्रधान मोदी, राहुल गांधी तसेच संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू हे एकत्र आले. यावेळी मोदी व राहुल यांच्यात हस्तांदोलन झाले. त्यामुळे 16 व्या लोकसभेत राहुल यांनी पंतप्रधानांना मारलेल्या मिठीच्या आठवणीही जाग्या झाल्या.

बिर्ला यांची पहिल्याच दिवशी कुरापत, इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादली!

आणीबाणी हे काळेकुट्ट पर्व होते. इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादून नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली, असे सांगत पहिल्याच दिवशी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी वाद ओढवून घेतला. बिर्ला यांनी काढलेल्या कुरापतीमुळे आक्रमक झालेल्या विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत आणीबाणीच्या संदर्भाने केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. यामुळे सभागृहात उडालेल्या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज तहकूब करण्याची नामुष्की अध्यक्षांवर ओढवली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;