झटपट पैशासाठी बनला शस्त्र तस्कर

झटपट पैशासाठी बनला शस्त्र तस्कर

शस्त्रविक्रीसाठी आलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या युनिट 10 ने अटक केली. अमित कुमार राय असे त्याचे नाव आहे. झटपट पैशासाठी तो शस्त्र तस्कर बनल्याची माहिती समोर आली आहे.  अंधेरी परिसरात एक जण शस्त्र विक्रीसाठी येणार असल्याची माहिती युनिट 10 ला मिळाली. प्रभारी पोलीस निरीक्षक दीपक सावंत याच्या पथकातील अधिकाऱयाने अंधेरी पूर्व परिसरात सापळा रचला. मंगळवारी रात्री राय हा शस्त्र घेऊन आला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली. राय हा नवी मुंबईच्या कळंबोली येथे राहतो. झटपट पैशासाठी तो शस्त्र तस्कर बनला.

शस्त्र तस्करीप्रकरणी रायविरोधात अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्याला अटक करून आज न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याला ते शस्त्र कोणी दिले याचा तपास युनिट 10 करत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;