अवैध रेस्टोबार पोलिसांच्या रडारवर

अवैध रेस्टोबार पोलिसांच्या रडारवर

‘डान्स फ्लोअर’ सुरू ठेवण्याचा परवाना नसतानाही मध्यरात्री दीडपर्यंत डीजे आणि डान्स फ्लोअर सुरू ठेवणाऱया रेस्टोबारवर आता पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. शहरात केवळ 24 रेस्टोबारला परवानगी आहे, मात्र अवैधरीत्या रेस्टोबार चालविण्यात येत असल्याने आता पोलिसांकडून कारवाई हाती घेण्यात येणार आहे.

शहरात रेस्टोबार सुरू करण्याचा परवाना उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात येता. मात्र त्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाची एक समिती घेत असते. तसेच या परवान्यासाठी पोलिसांच्या ना-हरकतीची गरज असते, तर ‘डान्स फ्लोअर’ असलेल्या रेस्टोबारला उत्पादन शुल्क विभागासह पोलिसांच्या परवान्याचीही गरज असते. अशा प्रकारचे शहर पोलिसांनी आतापर्यंत केवळ 24 परवाने दिले आहेत. त्यातील दोन पबच्या परवान्यांचे नूतनीकरण झालेले नाही. त्यामुळे अधिकृतपणे ‘डान्स फ्लोअर’ असलेले 22 पब अधिकृतपणे सुरू आहेत, मात्र प्रत्यक्षात परवाना नसताना ‘डान्स’ला प्रोत्साहन देणाऱया पबची संख्या मोठय़ा प्रमाणावर आहे. पोलीस आता अशा रेस्टोबारची माहिती संकलित करीत असून  त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे, अशी  माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

आवाजाची मर्यादा ओलांडणे, रात्री रेस्टोबार बंद करण्याच्या वेळेची मर्यादा उलटल्यानंतरही सुरू ठेवणे, रेस्टोबारच्या परिसरात तरुणांकडून गोंधळ घालणे अशा तक्रारी नागरिकांकडून केल्या जातात. त्या तक्रारींची शहानिशा करून शहर पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;