आषाढीवारीचे नियोजन कागदावरच; भाविकांना प्रचंड मनस्ताप, पंढरीच्या दर्शनरांगेत वादावादी, धक्काबुक्की, आणि चेंगराचेंगरी 

आषाढीवारीचे नियोजन कागदावरच; भाविकांना प्रचंड मनस्ताप, पंढरीच्या दर्शनरांगेत वादावादी, धक्काबुक्की, आणि चेंगराचेंगरी 

श्रीक्षेत्र पंढरपुरात आषाढीवारीच्या नियोजनासाठी शासकीय पातळीवर अनेक बैठका होतात, मात्र हे नियोजन कागदावरच राहते. त्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्याने भाविकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. श्री विठ्ठल-रखुमाई मातेच्या पदस्पर्श दर्शनासाठी आतापासूनच भाविकांची गर्दी होत आहे. परंतु दर्शन रांगेची व्यवस्थाच उभी न केल्याने गोंधळ उडाला. रांगेत उभे राहण्याच्या कारणावरून भाविकांमध्ये धक्काबुक्की, वादावादी आणि चेंगराचेंगरी आज पहायला मिळाली.

17 जुलै रोजी होणाऱया आषाढी वारी सोहळय़ासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्य प्रदेश, गोवा आदी राज्यांतून  दिंडय़ा आणि पालख्यांनी पंढरीकडे प्रस्थान ठेवले आहे. देहू येथून शुक्रवारी (दि. 28) जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांची पालखी तर शनिवारी (दि. 29) आळंदीतून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. तत्पूर्वी हजारो भाविक वारकऱयांनी श्री विठ्ठल-रखुमाई मातेच्या दर्शनासाठी पंढरपुरात गर्दी केली आहे. ही गर्दी लक्षात घेऊन मंदिर समितीने दर्शन रांगेची व्यवस्था वेळीच करणे अपेक्षित होते, मात्र अशी व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे भाविकांनीच हवी तशी दर्शन रांग लावून घेतली. काहीजण या रांगेत घुसल्यामुळे वादावादी, धक्काबुक्की आणि चेंगराचेंगरी झाली. ही माहिती मंदिर समिती व्यवस्थापनाला दिल्यानंतर समितीचे कर्मचारी आले आणि बांबूचे कठडे तयार करून दर्शन रांग केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;