शरद पोंक्षे यांच्या मुलाचं सिनेसृष्टीत पदार्पण; बाप-लेकाची जोडी पहिल्यांदाच करणार एकत्र काम

शरद पोंक्षे यांच्या मुलाचं सिनेसृष्टीत पदार्पण; बाप-लेकाची जोडी पहिल्यांदाच करणार एकत्र काम

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे एक नवा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या सिनेमाच्या माध्यमातून शरद पोंक्षे यांचा मुलगा स्नेह पोंक्षे सिनेसृष्टीत पदार्पण करतो आहे. काही दिवसांपूर्वीच शरद पोंक्षे आणि त्यांचा मुलगा स्नेह पोंक्षे यांनी आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली होती. वडील मुलाची ही जोडी प्रेक्षकांसाठी काय जबरदस्त घेऊन येणार, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होती. आता याचं उत्तर प्रेक्षकांना मिळालं आहे. ‘बंजारा’ असं स्नेह आणि शरद पोंक्षे यांच्या सिनेमाचं नाव आहे.

शरद पोंक्षेंच्या मुलाचं सिनेक्षेत्रात पदार्पण

आयुष्याच्या प्रवासावर भाष्य करणारा हा चित्रपट असल्याचे, प्रथम झलक पाहून कळतेय. चित्रपटाचे नाव जरी जाहीर झाले असले तरी या चित्रपटात कोणकोण कलाकार झळकणार, हे जाणून घेण्यासाठी आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान, मोरया प्रॉडक्शन्स आणि वि. एस. प्रॉडक्शन्स सादर करीत असलेल्या या चित्रपटाचे शरद पोंक्षे आणि रोहिणी विजयसिंह राजे पटवर्धन निर्माते आहेत. या चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण हे सिक्कीममध्ये झाले आहे.

शरद पोंक्षे यांनी नाटक, मालिका, चित्रपट या कलेच्या विविध माध्यमांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यानंतर ‘बंजारा’ चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहेत. वैशिष्टय म्हणजे या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन त्यांचा मुलगा स्नेह पोंक्षे करणार आहे. दिग्दर्शक म्हणून स्नेहचा हा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे प्रेक्षकांना काहीतरी भन्नाट आणि मनोरंजनात्मक पाहायला मिळणार आहे.

शरद पोंक्षे काय म्हणाले?

या नव्या सिनेमाविषयी शरद पौंक्षे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. लेकाच्या चित्रपटाच्या माध्यमातून मी निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. यापेक्षा वेगळा आनंद काही असूच शकत नाही. स्नेहच्या मनात ‘बंजारा’चा विचार आल्यापासून ते चित्रीकरणापर्यंतचा प्रवास मी पाहिला आहे. विषय वेगळा आहे. सर्वच वयोगटातील प्रेक्षकांना आवडेल असा हा चित्रपट आहे. खरंतर आयुष्यात प्रत्येक मनुष्य हा ‘बंजारा’ असतोच. चित्रपट पाहाताना याचा अनुभव येईलच, असं शरद पोंक्षे म्हणालेत.

स्नेह पोंक्षेची प्रतिक्रिया काय?

वडिलांसोबत प्रथमच काम करत आहे. त्यांच्या अनुभवाची मला खूपच मदत झाली. कुठे जायचंय, यापेक्षा तिथे जायचा प्रवास आनंददायी हवा, परंतु याच आनंदाला आपण बऱ्याचदा मुकतो. याचे महत्व अधोरेखित करणारा ‘बंजारा’ आहे. मला खात्री आहे, हा चित्रपट प्रेक्षकांना आवडेल, असं स्नेह पोंक्षे याने म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;