सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी TRAI चे मोठे पाऊल, जुलै पासून नावासह नंबर दिसणार

सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी TRAI चे मोठे पाऊल, जुलै पासून नावासह नंबर दिसणार

सायबर क्राइम हा शब्द ज्या वेगाने कानावर पडत आहे, त्याच्या दुप्पट वेगाने सायबर गुन्ह्यांमध्ये मागील काही वर्षांमध्ये वाढ झाल्याचे उघड झाले आहे. दिवसेंदिवस Cyber Crime मध्ये वाढ होत असून अनेक नागरिक त्याचे बळी ठरत आहेत. त्यामुळेच या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ट्राईने (TRAI) मोठे पाऊल उचलले आहे.

अनोळख्या नंबरवरुन येणारा फोन कोणाचा? याचे उत्तर फोन उचलल्या नंतरच समजते. बऱ्याच वेळा अनोळखी नंबर ओळखण्यासाठी विविध अॅप्सची मदत घेतली जाते. परंतु आता त्याची गरज पडणार नाही. कारण वाढती सायबर गुन्हेगारी भविष्यात अजून वाढण्याची शक्यता आहे. याच अुनषंगाने द टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडियाने (TRAI) मोठे पाऊल उचलले असून आता अनोळखी नंबरवरुन फोन आल्यास नंबरसह त्याचे नाव सुद्धा दिसणार आहे. प्रामुख्याने मुंबई आणि हरियाणा या दोन शहरांमध्ये त्याची चाचणी सुरू करण्यात आली आहे, तर संपूर्ण देशामध्ये ही सेवा 15 जुलै पासून सुरू होणार आहे.

ज्या व्यक्तीच्या नावे सीमकार्ड खरेदी केले जाईल, त्याच व्यक्तीचे नाव नंबर सोबत दिसणार आहे. तसेच व्यवसायाच्या संबंधित फोन आल्यास संबंधित कंपनीचे नाव नंबरसह दिसणार आहे. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे दूरसंचार कंपन्यांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;