KALKI 2898 AD | ओपनिंग पूर्वीच कल्कीवर पैशांचा पाऊस, RRR आणि बाहुबलीला देणार कांटे की टक्कर?

KALKI 2898 AD | ओपनिंग पूर्वीच कल्कीवर पैशांचा पाऊस, RRR आणि बाहुबलीला देणार कांटे की टक्कर?

अमिताभ बच्चन आणि प्रभास यांचा कल्की 2898 एडी ची दररोज बंपर ॲडव्हान्स बुकिंग होत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यास अजून एक दिवस बाकी असताना कल्कीला केवळ भारतातच नव्हे तर जगभरातून आगाऊ बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळत आहे. इतकेच नाही तर प्रभासच्या चित्रपटाचा पहिला शो तेलंगणामध्ये रिलीजच्या पहिले आठ दिवस सकाळी 5.30 वाजल्यापासून सुरू होणार आहेत. आत्तापर्यंत या चित्रपटाची भारतात आगाऊ बुकिंगद्वारे तीन लाख तिकिटे विकली गेली आहेत अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे कल्की 2898 एडी ही ओपनिंगच्या बाबतीत बाहुबली आणि आरआरआरला मागे टाकू शकते अशीही चर्चा आहे.

कल्की 2898 एडी मध्ये शतकातील मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत साउथ सुपरस्टार प्रभास हा पहिल्यांदा स्क्रीन शेअर करत आहे. या जोडीसोबत दीपिका पदुकोणही कल्की मध्ये झळकत आहे. या चित्रपटाचे प्रमोशन जोरात सुरू झाले आहे. येत्या 27 जून रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. कल्की 2898 AD संपूर्ण भारतात 120-140 कोटी रुपयांमध्ये तर जगभरात 200 कोटींची ओपनिंग करेल असे अनेक ट्रेड ॲनालिस्ट्सचे मत आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या तेलगू राज्यांमध्ये हा चित्रपट 90 ते 100 कोटींची कमाई करेल. तर, उत्तर भारतात कल्की 2898 एडी 20 कोटी रुपये कमावेल. कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमध्ये हा चित्रपट 15 कोटींहून अधिक कमाई करू शकतो असा अंदाज आहे.

बुकिंग साइट क्रॅश झाली

अनेक राज्यांमध्ये कल्की 2898 एडी च्या आगाऊ बुकिंगची मागणी प्रचंड वाढली आहे. बुक माय शो या साईटवरून तिकीट बुकिंगवर ताण पडल्याने ही वेबसाइट क्रॅश झाली. विशेषता दक्षिणेकडील राज्यांमध्ये ही क्रॅश झाली आहे. त्यामुळे आगाऊ बुकिंगमध्ये या सायन्स फिक्शन चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. तेलुगुमध्ये (3D, 2D आणि IMAX 3D) कल्कीने 7.7 कोटी रुपये कमावले आहेत. हिंदीमध्ये 1738 शोसाठी 13,833 तिकिटे विकली गेली आहेत. यातून 43.6 लाख रुपये कंमवले आहेत. तर, तामिळ (3D, 2D) मध्ये 278 शोसाठी 2925 तिकिटे विकून 5.12 लाख रुपये कमावले आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;