दहा वर्षांपासून चित्रपटांपासून दूर; तरी रेखा कुठून करतात कमाई?
बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा यांना वेगळ्या कोणत्याच परिचयाची गरज नाही. लहानपणी अनेक समस्यांचा सामना केलेल्या रेखा यांनी कमी वयातच अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यांचं हिरोइन बनण्याचं स्वप्न नव्हतं, मात्र परिस्थितीमुळे त्या अभिनयक्षेत्रात पोहोचल्या.
तरीसुद्धा आपल्या दमदार अदाकारीच्या जोरावर त्यांनी इंडस्ट्रीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. आज वयाच्या 69 व्या वर्षीही त्या सौंदर्याच्या बाबतीत तरुण अभिनेत्रींनाही मात देतात. रेखा यांचं खरं नाव भानुरेखा गणेशन असं आहे. त्यांनी करिअरमध्ये आतापर्यंत 180 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय.
मात्र गेल्या दहा वर्षांपासून त्या मोठ्या पडद्यापासून दूर आहेत. इतक्या वर्षांपासून काम न करताही रेखा यांची कमाई कुठून होते, असा प्रश्न अनेकांना पडतो. गुगलपासून कोरापर्यंत अनेकांनी याबद्दल प्रश्न विचारला आहे.
रेखा यांची मुंबईपासून दक्षिण भारतापर्यंत बरीच प्रॉपर्टी आहे. त्यापैकी काही त्यांनी भाड्याने दिले आहेत. या प्रॉपर्टीतून रेखा यांना लाखोंचं भाडं येतं.
रेखा या मुंबईतल्या बँडस्टँड परिसरात राहतात. त्यांच्या एका बाजूला शाहरुख खानचा 'मन्नत' बंगला आहे तर दुसरीकडे सलमान खानचं 'गॅलेक्सी अपार्टमेंट्स' आहे. रेखा यांच्या या बंगल्याची किंमत जवळपास 100 कोटी रुपये इतकी आहे. या बंगल्याचं नाव 'बसेरा' असं आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.






Comment List