Malaika Arora : ‘पाठ फिरवल्यानंतर विश्वास…’, अर्जुनच्या वाढदिवशी मलायकाची क्रिप्टिक पोस्ट
अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांच्या नात्याबद्दल प्रत्येकाला माहिती आहे. एकेकाळी कपल गोल्स देणाऱ्या अर्जुन - मलायका यांच्या ब्रेकअपची चर्चा रंगली आहे.
गेल्या 5 वर्षांपासून एकत्र वाढदिवस साजरा करणारे मलायका - अर्जुन आता विभक्त झाल्याची माहिती मिळत आहे. शिवाय अर्जुन याच्या वाढदिवशी अभिनेत्रीने क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे.
इन्स्टाग्राम स्टोरीवर अभिनेत्रीने एक पोस्ट शेअर केली आहे. 'डोळे बंद केल्यानंतर आणि पाठ फिरवल्यानंतर विश्वास ठेऊ शकतो... अशीच लोकं मला आवडतात...' असं अभिनेत्रीचं स्टेटस आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List