विरोधी पक्षाचा आवाज दाबणे हे लोकशाहीच्या विरोधात आहे; राहुल गांधी यांनी ठणकावलं

विरोधी पक्षाचा आवाज दाबणे हे लोकशाहीच्या विरोधात आहे; राहुल गांधी यांनी ठणकावलं

लोकसभेच्या अध्यक्ष पदावर ओम बिर्ला यांची निवड झाल्यानंतर लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी अभिनंदनपर भावना व्यक्त केल्या. यावेळी शुभेच्छा देत असतानाच त्यांनी कानही टोचले. विरोधी पक्षाचा आवाज दाबणे हे लोकशाहीच्या विरोधात आहे, अशा शब्दात राहुल गांधी यांनी ठणकावलं.

‘मला विश्वास आहे की तुम्ही आम्हाला बोलू द्याल. प्रश्न हा नाही की सभागृह किती कार्यक्षमतेने चालवले जाते. प्रश्न हा आहे की INDIA चा आवाज किती ऐकू दिला जातो. त्यामुळे विरोधी पक्षाला शांत करून तुम्ही सभागृह कार्यक्षमतेने चालवू शकता हा लोकशाही विरोधी विचार आहे आणि या निवडणुकीने हे दाखवून दिले आहे की देशातील नागरिकांनी विरोधकांना संविधानाच्या रक्षण करण्यासाठी विश्वासानं पाठवलं आहे’, असे राहुल गांधी म्हणाले.

‘लोकसभेचे विरोधी पक्षते नेते राहुल गांधी यांनी अध्यक्ष पदी पुन्हा निवडून आलेल्या ओम बिरला यांना शुभेच्छा दिल्या. राहुल गांधी यांनी म्हटलं की विरोधी पक्ष सरकार सोबत सहयोग करू इच्छित आहे. सरकारकडे राजकीय ताकद अधिक आहे मात्र विरोधी पक्ष देखील हिंदुस्थानचं प्रतिनिधित्व करतो. आम्हाला विश्वास आहे की तुम्ही आम्हाला आवाज उठवू द्याल. विरोधी पक्षाचा आवाज दाबणे हे लोकशाहीच्या विरोधात आहे. विरोधी पक्ष तुम्हाला संपूर्ण सहाय्य करेल’, असंही राहुल गांधी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;