अर्जुन कपूरची बर्थडे पार्टीतून गायब मलायका अरोरा, 5 वर्षांनंतर ब्रेकअप? चर्चांना उधाण

अर्जुन कपूरची बर्थडे पार्टीतून गायब मलायका अरोरा, 5 वर्षांनंतर ब्रेकअप? चर्चांना उधाण

अभिनेता अर्जुन कपूर त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाहीतर, खासगी आयुष्यामुळेअ अधिक चर्चेत असतो. आज अर्जुन कपूर याचा वाढदिवस आहे. आज अर्जुन 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. बुधवारी वाढदिवस असल्यामुळे मंगळवारी अभिनेत्याच्या घरी पार्टी ठेवण्यात आली होती. वांद्रे येथील राहात्या घरी अर्जुन कपूर याच्या वाढदिवसाच्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अभिनेत्याने कुटुंबिय आणि मित्रांसोबत वाढदिवस साजरा केला. अभिनेत्याला शुभेच्छा देण्यासाठी अनेक सेलिब्रिटी अभिनेत्याच्या घरी पोहोचले होते. पण अभिनेत्री मलायका अरोरा मात्र पार्टीतून गायब होती.

अर्जुन कपूर याच्या वाढदिवसासाठी ठेवण्यात आलेल्या पार्टीमध्ये मलायका दिसली नसल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे आता पुन्हा मलायका आणि अर्जुन यांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मलायका – अर्जुन यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. पण यावर दोघांनी देखील अधिकृत घोषणा केलेली नाही.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

अर्जुन कपूर याच्या बर्थडे पार्टीमध्ये जान्हवी कपूर, शनाया कपूर, मेहित मारवाह, संजय कपूर, माहीप कपूर यांसारखे अनेक सेलिब्रिटी उपस्थिती होते. अर्जुन कपूर याचा खास मित्र आणि अभिनेता वरुण धवन देखील पत्नी नताशा हिच्यासोबत पोहोचला होता. तर आदित्य रॉय कपूर देखील पार्टीमध्ये होता.

मलायका अरोरा – अर्जुन कपूर

अभिनेता अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूर याच्यासोबत आनंदाने आयुष्य जगत होती. पण आता अर्जुन आणि मलायका यांचे मार्ग देखील वेगळे झाल्याची माहिती मिळत आहे. 2019 मध्ये मलायका – अर्जुन यांनी सर्वांसमोर नात्याची घोषणा केली.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

 

दोघांनी नात्याची घोषणा केल्यानंतर अनेकांनी दोघांचा विरोध देखील केला. पण अर्जुन – मलायका यांनी होत असलेल्या विरोधाकडे लक्ष न देता फक्त त्यांच्या भावनांना महत्त्व दिलं. पण आता 5 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अर्जुन – मलायका यांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;