जुही चावलाचे पती कोण? त्यांच्याकडे अब्जावधींची संपत्ती, केकेआरचे को-ओनर आणि बरंच काही…

जुही चावलाचे पती कोण? त्यांच्याकडे अब्जावधींची संपत्ती, केकेआरचे को-ओनर आणि बरंच काही…

अभिनेत्री जुही चावला हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही जुही हिचे अनेक सिनेमे चाहते आवडीने पाहातात. जुही आता बॉलिवूडपासून दूर असली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. लग्नानंतर जुही हिने अभिनय क्षेत्राचा निरोप घेतला. आता अभिनेत्री पतीला व्यवसायात मदत करत आहे. जुही हिच्या पतीचं नाव जय मेहता असं आहे. जय मेहता प्रसिद्ध उद्योजक आहेत.

जुही चावला तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेकदा चर्चेत आली आहे. जुही चावला हिने 1995 साली उद्योजक जय मेहता यांच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर सहा वर्ष अभिनेत्रीने लग्न केल्याचं सत्य कोणालाही सांगितलं नाही. लग्नानंतर अभिनेत्रीला अनेकदा ट्रोल देखील करण्यात आलं.

कोण आहेत जय मेहता?

उद्योग क्षेत्रातील सर्वात मोठं नाव जय मेहता यांचं आहे. जय मेहता हे मेहता ग्रुपचे अध्यक्ष आहेत. फक्त देशातच नाहीतर, परदेशात देखील जय मेहता यांचा व्यवसाय आहे. जय यांची कंपनी सिमेंट, बांधकाम साहित्यापासून ते अभियांत्रिकी अशा अनेक क्षेत्रात काम करते.

जय यांचा हा व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत आला आहे. जय त्यांच्या आजोबांचा व्यवसाय पुढे नेत आहे. मेहता समूहाची संपत्ती 5000 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त आहे. आज जय मेहता त्यांच्या कुटुंबियांसोबत आलिशान आयुष्य जगत आहेत. सोशल मीडियावर देखील त्यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

जय मेहता यांची पहिली पत्नी

जुही चावला ही जय मेहता यांची दुसरी पत्नी आहे. जय मेहता यांच्या पहिल्या पत्नी विमान अपघातात निधन झालं. पहिल्या पत्नीच्या निधनानंतर जय मेहता पूर्णपणे खचले होते. तेव्हा जुही चावला हिने जय मेहता यांना आधार दिला. त्यानंतर जय मेहता आणि जुही चावला यांनी लग्न केलं.

आज जुही चावला आणि जय मेहता त्यांच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहेत. दोघांमध्ये सहा वर्षांचं अंतर आहे. लग्नानंतर जुही चावला हिने दोन मुलांना जन्म दिला जुही हिच्या मुलीचं नाव जान्हवी मेहता आहे तर, मुलाचं नाव अर्जुन मेहता आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;